शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA चा अनोखा रेकॉर्ड! दिवाळीपूर्वी एकाच दिवशी लॉंच केली २१ वाहने; इलेक्ट्रिक बसचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 9:54 PM

1 / 11
गेल्या काही महिन्यांपासून TATA ग्रुपचा अनेकविध क्षेत्रात धुमाकूळ सुरूच आहे. टेकपासून अगदी अॅपर्यंत टाटा ग्रुपची दमदार कामगिरी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ भारतीय बाजारात नाही, तर शेअर मार्केटमध्येही टाटाच्या अनेक कंपन्या विक्रमी घोडदौड करत असून उत्तम परतावा देत आहेत.
2 / 11
यातच आता TATA ग्रुपमधील Tata Motors ने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केल्याचे सांगितले जात आहे. टाटा मोटर्सने कमर्शियल व्हेइकल सेगमेंटमध्ये एकाच दिवशी तब्बल २१ वाहने लॉंच केली आहेत. तसेच दिवाळीपूर्वी टाटा मोटर्सने आपल्या कमर्शिअल वाहनांच्या रेंजमध्ये विस्तार केल्याचे सांगितले जाते.
3 / 11
Tata Motors ने मिडियम आणि हेवी सेगमेंटमध्ये ७ नवीन ट्रक लॉंच केले आहेत. ग्राहकांचा अनुभव चांगला करण्याचा प्रयत्न या माध्यमातून टाटा करत असल्याचे सांगितले जात आहे. या ट्रकच्या मायलेज सुधारणा करण्यात आली असून, मेंटेनन्स कॉस्ट कमी करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे.
4 / 11
टाटा मोटर्सकडून लॉंच करण्यात आलेल्या ७ ट्रकमध्ये Signa 5530 S, Signa 4623 S, Signa 4625 S ESC, Signa 4221 T, Signa 4021 S, Signa 3118 T आणि Prima 2830 K यांचा समावेश आहे.
5 / 11
Tata Motors ने या ७ ट्रकसह इंटरमीडिएट आणि लाइट कमर्शियल व्हेइकल सेगमेंटमध्ये छोटा हाथी म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये टाटाने नवीन ५ वाहने लॉंच केली आहे. या कॅटेगरीमध्ये Ultra T18 SL, 407G, 709G CNG, LPT 510 आणि Ultra T6 यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 11
तसेच याशिवाय Tata Motors ने स्मॉल कमर्शिअल आणि पिक-अप कॅटेगरीमध्ये Tata Ace चा विस्तार केला आहे. या सेगमेंटमध्ये Winger Cargo, Ace Petrol CX Cab Chassis, Ace Gold Diesel+ आणि Intra V30 HIgh Deck ही वाहने लॉंच केली आहे. यांचा उपयोग छोट्या छोट्या भागातील दुकानांमधील डिलिव्हरी आणि पार्सलसाठी करता येऊ शकेल, असे म्हटले जात आहे.
7 / 11
एवढेच नव्हे तर Tata Motors ने या २१ वाहनांसह इलेक्ट्रिक बसची लॉंच केली आहे. या बसचे नाव Starbus 4/12 असे असून, कंपनीकडून आणखी चार वाहने लॉंच केली आहेत. यामध्ये Winger 15S, Starbus 2200, Cityride Prime आणि Magna Coach यांचा समावेश आहे.
8 / 11
दरम्यान, एकीकडे सेमीकंडक्टरच्या वाढत्या चणचणीमुळे वाहन उद्योगावर नवे संकट घोंघावताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून Tata मोटर्सचा बोलबाला कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. Tata मोटर्स एकापेक्षा एक जबरदस्त कार टाटा लाँच करत आहे.
9 / 11
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांना मागे टाकत Tata मोटर्सने सप्टेंबर २०२१ च्या विक्रीत २८ टक्के वाढ नोंदवली आहे. तर गेल्या तिमाहीचा विचार करता Tata मोटर्सची वाहन विक्री ५५ टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
10 / 11
सप्टेंबर महिन्यात तर Tata मोटर्सची मध्यम आकाराची एसयूव्ही Tata Nexon देशातली सर्वात जास्त विक्री होणारी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.
11 / 11
Tata मोटर्स भारतात हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये ६ शानदार कार विकते. यासह, टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्येही काही जबरदस्त कार उतरवल्या असून, या सेगमेंट सेलमध्ये Tata नेच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटा