शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA ची कार खरेदी करताय? ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय; स्पेशल ऑफरसह मिळतोय बंपर डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 6:30 PM

1 / 12
TATA ग्रुपमधील Tata Motors कंपनीची घोडदौड यशस्वीरित्या सुरू आहे. बाजारपेठेसह शेअर मार्केटमध्ये टाटा मोटर्स धमाकेदार कामगिरी करत आहे. आपल्या नवनवीन वाहनांमुळे टाटा मोटर्सने पुन्हा एकदा भारतीयांची मने जिंकली आहेत.
2 / 12
Tata Motors आपल्या गाड्यांवर या महिन्यात मोठा डिस्काउंट देत आहे. कंपनी कडून Tata Nexon, Tiago, Tigor पासून Harrier आणि Safari सारख्या गाड्यांवर स्पेशल ऑफर दिली जात आहे.
3 / 12
Tata Motors ग्राहकांना एकूण ६५ हजार रुपयांपर्यंत मोठी सूट मिळत आहे. ही ऑफर्स मर्यादीत कालावधीसाठी आहे तसेच वेगवेगळ्या राज्य आणि डिलरशीपनुसार बदलू शकतात.
4 / 12
Tata Nexon आताच्या घडीला टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. एवढेच नव्हे, तर टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक पर्यायातही उपलब्ध असून, आगामी काळात सीएनजीच्या पर्यायात मिळू शकेल, अशा चर्चा आहेत.
5 / 12
Tata Nexon च्या डिझेल मॉडलच्या सर्व व्हेरियंट्सवर २० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यावर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयाचा कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.
6 / 12
Tata Safari 2021 मॉडल वर ६० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर, 2022 Tata Safari वर एकूण ४० हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
7 / 12
Tata Tiago 2021 मॉडलवर कंपनीकडून एकूण २८ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यात १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयाचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
8 / 12
Tata Tiago 2022 वर २३ हजार रुपयांपर्यंत मोठा डिस्काउंट मिळत आहे. यात १० हजार रुपयाचा कॅश डिस्काउंट, १० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. टाटा टियागोच्या सीएनजी मॉडलवर कोणतीही सूट मिळत नाही.
9 / 12
Tata Tigor 2021 मॉडलवर २८ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात १० हजार रुपयांचा कॅशबॅक बोनस, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट आणि ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
10 / 12
Tata Tigor 2022 वर ग्राहकांना २३ हजार रुपयाची सूट मिळत आहे. ज्यात १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ३ हजार रुपयाची अतिरिक्त सूट मिळवू शकतात. याच्या सीएनजी मॉडलवर कोणतीही सूट दिली जात नाही.
11 / 12
Tata Harrier 2021 मॉडलच्या सर्व व्हेरियंट्सवर ६५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात २० हजार रुपयाचा कॅश डिस्काउंट, ४० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयाचा कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.
12 / 12
Tata Harrier 2022 च्या सर्व व्हेरियंट्सवर ४५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात ४० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयाचा कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.
टॅग्स :Tataटाटा