tata motors price hike know about how much Nexon Safari and Altroz will cost now
ग्राहकांना फटका! Tata Motors च्या सर्वच कार महागल्या; पाहा, नवीन किमती By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 12:30 PM1 / 10देशातील आघाडीची कारनिर्मिती करणारी कंपनी Tata Motors ने आपल्या सर्व कारच्या किमती वाढवल्या आहेत. गेल्यावर्षीपासून टाटाची वाहने पुन्हा लोकप्रियतेची नवीन शिखरे गाठत आहेत. 2 / 10Tata Motors पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत चमकदार कामगिरी करताना दिसत असून, टाटाचे ग्राहक अनेक पटींने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 3 / 10Tata Motors ने सर्व कारच्या मॉडेलनुसार किमती वाढवल्या आहेत. टाटा टियागो आणि टिगोरच्या किंमती १५ हजार रुपयांनी वाढल्या आहेत. 4 / 10Tata नेक्सॉन आणि अल्ट्रॉझच्या किमतीतही ३३ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय कंपनी नवीन एसयूव्ही टाटा सफारीच्या किमतीत ३६ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.5 / 10टाटाने हॅचबॅकच्या एक्सई बेस आणि एक्सएम सेकंड बेस व्हेरिएंटमध्ये सर्वाधिक वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे. टियागोच्या किंमतीत ८ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून, आता याची किंमत ४,९९,९०० रुपये ते ६ ,९५,९०० रुपये आहे. 6 / 10टाटा टिगोरच्या किमतीत १० हजार ते १२ हजार रुपये वाढ झाली असून, याच्या एक्सझेड प्लस आणि एक्सएमए व्हेरिएंटच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आता याची किंमत ५,५९,९०० रुपयांपासून ते ७,७३,९०० रुपये आहे. 7 / 10टाटाची प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रॉझच्या नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन व्हेरिएंटच्या किंमतीत १४,४०० रुपये ते १५,४०० रुपये, टर्बो पेट्रोल इंजिन व्हेरिएंटमध्ये २०,४०० रुपये आणि डिझेल इंजिन व्हेरिएंटच्या किंमतीत ५,४०० रुपये ते २८,००० रुपयांनी वाढ झाली आहे.8 / 10टाटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनच्या पेट्रोल इंजिन व्हेरिएंट्सची किंमत १० हजार रुपये ते ३३,४०० रुपये आणि डिझेल इंजिन व्हेरिएंट्सची किंमत ४,४०० रुपये ते १६,४०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता याची किंमत ७,१९,९०० रुपये ते १२,९५,९०० रुपये झाली आहे.9 / 10नवीन जनरेशन टाटा सफारीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. याच्या किंमतीत ३६ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीने याच्या बेस व्हेरिएंट्सची किंमत ३० हजार रुपयांनी तर इतर सर्व व्हेरिएंट्सची किंमत ३६ हजार रुपयांनी वाढवली आहे.10 / 10टाटाने आपल्या वाहनांच्या किमतीत १.८ टक्क्यांची वाढ केली असून, ८ मे २०२१ पासून वाढीव किमतीसह सर्व कार विक्रीसाठी उपलब्ध असतील, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications