शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Altroz ला २ वर्षे पूर्ण! एकापेक्षा एक नवीन फिचर्स; २ व्हेरिएंट्स डार्क थीमसह लॉंच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 7:31 PM

1 / 9
आताच्या घडीला देशभरातील बाजारपेठेत TATA च्या वाहनांचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेल असो, सीएनजी असो किंवा इलेक्ट्रिक कार असो, टाटा वाहनांना प्रचंड मागणी असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे, तर टाटाच्या अनेक कारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
2 / 9
यातच आता TATA ग्रुपमधील Tata Motors कंपनीच्या Tata Altroz या प्रीमियम हॅचबॅक कार आपला दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहे. दोन वर्षांच्या पूर्तीनिमित्त टाटाने ग्राहकांसाठी डार्क थीमसह दोन व्हेरिएंट लॉंच केल्याची माहिती मिळाली आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये नवनवीन भन्नाट फिचर्सही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
Tata Motors ने फेब्रुवारी २०२० मध्ये भारतीय बाजारात टाटा अल्ट्रॉजला लाँच केले होते. बाजारात एक प्रीमियम हॅचबॅकच्या रुपात लाँच करण्यात आली होती. अल्ट्रोजने कठीण परिस्थितीचा सामना केला. यासोबतच या कारला अनेक ग्राहकांनी रिस्पॉन्स दाखवला आहे.
4 / 9
Tata Altroz च्या XT ट्रिममध्ये डार्क एडिशनची बुकिंग आता कंपनी डीलरशीपवर सुरू केली आहे. या कारची दिल्ली एक्स शोरूम किंमत ७.९६ लाख रुपये आहे. याशिवाय, डार्क थीमलाआता XZ+ (डिझेल) ट्रिममध्येही उपलब्ध करण्यात आले आहे.
5 / 9
Tata Motors कंपनीच्या एकूण विक्रीत Tata Altroz कारचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले जात आहे. लाँचिंगनंतर टाटा अल्ट्रोजच्या १.२ लाख यूनिट्सची विक्री केली आहे. टाटा अल्ट्रोजने प्रीमियम हॅचबॅक मार्केट मध्ये आपली वेगळी ओळख बनवली आहे.
6 / 9
Tata Altroz ने हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये २० टक्क्यांहून जास्त मार्केट शेअरसोबत ही ग्राहकांची लोकप्रिय कार राहिली आहे. XT आणि XZ+ व्हेरिएंट्स Altroz Dark कारचे व्हिज्युअल्स जबरदस्त असल्याचे बोलले जात आहे.
7 / 9
Tata Altroz Dark मध्ये यात परफोरेटेड लेदर सीट्स, रियर आर्मरेस्ट, 'डार्क' टिंट हाइपर-स्टाइल व्हील्स, हाइट एडजस्टेबल ड्राइवर सीट, रियर हेडरेस्ट, फ्रंट एडजस्टेबल सीट बेल्ट्स सोबत लेदर स्टीयरिंग व्हील, लेदर गियर नॉब मिळते. याशिवाय, टॉप-ऑफ-द-लाइन XZ+ व्हेरिएंटला आता ब्रेक स्वे कंट्रोल आणि iTPMS सारखे नवीन अतिरिक्त सेफ्टी फीचर्स मिळतात.
8 / 9
Tata Altroz एकूण सहा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात तीन इंजिन ऑप्शन १.२ लीटर रेवोट्रोन पेट्रोल, १.२ लीटर आय टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिन असे पर्याय देण्यात आहेत. टाटा अल्ट्रोजला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये स्टार रेटिंग मिळाली आहे.
9 / 9
Tata Altroz कारची एक्स शोरूम किंमत जवळपास ५.९० लाख रुपयांपासून सुरू होते. भारतीय बाजारात या कारची टक्कर मारुती सुझुकी बलेनो आणि ह्युंदाई आय २० सारख्या कारशी होते.
टॅग्स :Tataटाटा