शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA साठी ‘या’ २ कार ठरल्या वरदान! रेकॉर्डब्रेक विक्री; स्पर्धक कंपन्यांना धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 7:52 PM

1 / 9
गेल्या अनेक महिन्यांपासून TATA ग्रुपमधील टाटा मोटर्स कंपनीने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. विक्रीमध्ये कधी काळी पहिल्या ५ मध्ये न येणारी टाटा मोटर्स आता दुसऱ्या क्रमांकासाठी ह्युंदाई मोटर्सशी झगडत आहे.
2 / 9
टाटा मोटर्सने अगदी कोरोना काळातही दमदार कामगिरी करत आपल्या कारच्या विक्रीचा आलेख उचांवत ठेवला. टाटा मोटर्सच्या दोन कारची जबरदस्त विक्री झाली असून, या कार टाटासाठी मोठ्ठ वरदान ठरल्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
टाटाच्या सर्वाधिक विक्री झालेल्या कारपैकी सर्वांत आघाडीवर असणारी कार म्हणजे TATA Nexon. ही कार पारंपारिक इंधन पर्यायाशिवाय इलेक्ट्रिक स्वरुपातही उपलब्ध आहे. याशिवाय काही महिन्यांत या कारचे सीएनजी व्हर्जनही टाटा लॉंच करायच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
जानेवारी २०२२ TATA Nexon या कारचे सर्वाधिक म्हणजे १३ हजार ८१६ युनिट विकले गेले आहे. तसेच टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वांत जास्त विकली जाणारी चौथी एसयूव्ही ठरली आहे.
5 / 9
टाटा नेक्सॉननंतर टाटा पंचचा क्रमांक लागत असून, अवघ्या ६ महिन्यांत या कारने विक्रीमध्ये पहिल्या १० कारच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. जानेवारी महिन्यात टाटा पंच कारच्या १० हजार ०२७ युनिटची विक्री झाली. टाटा पंचही इलेक्ट्रिक आणि सीएनजी स्वरुपात सादर करण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी चर्चा आहे.
6 / 9
दरम्यान, Tata Motors च्या कारची जानेवारी महिन्यात मोठी विक्री झाली आहे. डिसेंबरमध्ये ह्युंदाईला मागे टाकून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रमही कंपनीने प्रस्थापित केला.
7 / 9
कंपनीच्या देशांतर्गत वाहन विक्रीत गेल्या महिन्यात २६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती टाटा मोटर्सने दिली. जानेवारी २०२२ मध्ये एकूण ७२,४८५ युनिट्सची विक्री केली आहे. यापूर्वी जानेवारी २०२१ मध्ये कंपनीने ५७,६४९ युनिट्सची विक्री केली होती.
8 / 9
प्रवासी वाहनांबाबत सांगायचे झाल्यास कंपनीने आणखी मोठी झेप घेतली आहे. टाटा मोटर्सने या वर्षी जानेवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. कंपनीने प्रवासी वाहनांच्या ४०,७७७ युनिट्सची विक्री केली आहे, जी या विभागातील टाटा मोटर्सची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.
9 / 9
टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक वाहन विक्री जानेवारीमध्ये पाच पटीने वाढून २,८९२ युनिट्सवर पोहोचली. कंपनीने जानेवारी २०२१ मध्ये ५१४ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली. यामध्ये Tata Nexon EV आणि Tigor EV यांचा समावेश आहे.
टॅग्स :Tataटाटा