शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काहीच दिवसांची प्रतिक्षा! Tata ची ‘ही’ स्वस्तात मस्त SUV १२ व्हेरिअंट्स, ६ आकर्षक रंगांमध्ये येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 3:55 PM

1 / 10
Tata मोटर्सने खरोखरच कात टाकली आहे. एकापेक्षा एक जबरदस्त कार टाटा लाँच करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून Tata Punch या कारबाबतची उत्सुकता अगदी शिगेला गेली आहे.
2 / 10
नेक्सॉन, हॅरियर आणि अल्ट्रोज यांचे मिश्रण म्हणजे ही कार असल्याचे सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला Tata Punch लॉंच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय देशभरातील टाटा डिलर्सकडे ही कार पोहोचली असून, नवनवे व्हिडिओ समोर येत आहेत.
3 / 10
मात्र, ही कार कधी लॉंच होणार, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Tata Punch ला फाईव्ह स्टार रेटिंग मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. नवीन छोटी SUV अल्फा मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याच प्लॅटफॉर्मवर अल्ट्रूझ बनविण्यात आली असून, तिला फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे.
4 / 10
लाँच होण्याआधीच Tata Punch व्हेरिअंट्सबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, ही कार ४ ट्रिम आणि १२ व्हेरिअंट्समध्ये येणार आहे. तसेच ही कार व्हाइट, ग्रे, ब्राँझ, ऑरेंज, ब्लू आणि स्टोनहेंज अशा ६ आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये येईल, असेही सांगितले जात आहे.
5 / 10
Tata मोटर्स कंपनीकडून Tata Punch च्या व्हेरिअंटबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही माइक्रो एसयूव्ही टाटा मोटर्सच्या नवीन ALFA-ARC प्लॅटफॉर्मवर आणि Impact 2.0 डिझाइन लँग्वेजवर आधारित आहे.
6 / 10
Tata मोटर्सने Tata Punch च्या प्री-बुकिंगसाठी अधिकृतपणे सुरूवात केल्याचे अजून जाहीर केले नाही. मात्र, कंपनीच्या अनेक डीलरशिप्समध्ये या कारसाठी ५ हजार ते २१ हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुकिंग घेण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
7 / 10
Tata Punch मायक्रो एसयुव्ही Maruti Ignis, S-Presso, Mahindra KUV100 आणि Renault Kwid यांच्याशी स्पर्धा करेल. Tata Punch च्या किंमतीबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
8 / 10
मात्र, Tata Punch ५ लाख ते ८.३० लाख रुपयांमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ७ इंच इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ड्युअल एअर बॅग्स, क्रूज कंट्रोल, रिअर आर्मरेस्ट कप होल्डर, ईबीडी, एबीएस, रिअर पार्किंग सेन्सरसह अनेक स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्सही मिळतील, असे सांगितले जात आहे.
9 / 10
Tata Punch मध्ये नेक्सॉनसारखेच ३ ड्राइव्ह मोड असण्याची शक्यता आहे. नेक्सॉनमध्ये स्पोर्ट, सिटी आणि इको मोड देण्यात आले आहेत. इको ड्राईव्ह मोडमध्ये चांगले मायलेज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
10 / 10
स्पोर्ट ड्राईव्ह मोडमध्ये ड्रायव्हिंग परफ़ॉर्मन्स मिळणार आहे. कारण यामध्ये थ्रॉटल क्रियेचा पुरेपूर वापर केला जातो. सिटी ड्राईव्ह मोडमध्ये चांगले मायलेज, सोबत चांगला परफॉर्मन्सही मिळेल, असे म्हटले जात आहे.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटा