शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA ची भन्नाट ऑफर! केवळ २ लाख भरा अन् ‘ही’ जबरदस्त EV कार घरी न्या; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 8:23 PM

1 / 9
देशात आताच्या घडीला TATA ग्रुपमधील टाटा मोटर्स कंपनीचा भारतीय बाजारात मोठा बोलबाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनी दमदार कामगिरी करत असून, टाटावरील लोकांचा विश्वास वाढल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
2 / 9
पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना याला पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार सादर करण्याचा निर्णय घेतला. भविष्य हे इलेक्ट्रिक कारचे आहे, हे ओळखून आगामी काळात जगातील विविध कंपन्या आपली उत्पादने ईव्ही पर्यायतच सादर करणार आहेत.
3 / 9
भारतातील EV क्षेत्रात TATA धुमाकूळ घालत असून, आतापर्यंत टाटाने सादर केलेल्या कारना प्रचंड मागणी असल्याचे सांगितले जात आहे. इलेक्ट्रिक कार विक्रीबाबतीत टाटाने सर्व कंपन्यांना धोबीपछाड देत आपली आघाडी कायम ठेवली आहे.
4 / 9
Tata Motors ने अलीकडेच लॉंच केलेली Tata Tigor EV कारची चांगली विक्री होत आहे. यात सर्वात स्वस्त आणि चांगली इलेक्ट्रिक कार टाटा टिगोर ईव्ही सुद्धा लोकांना खूप पसंत पडत आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर टिगोर इलेक्ट्रिक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
5 / 9
Tata Tigor EV ही देसी इलेक्ट्रिक सेडान एकदा फुल चार्ज झाली तर ३०६ किमी पर्यंत चालू शकते. सोबत टिगोर इलेक्ट्रिक लूक आणि फीचर्स मध्ये सुद्धा शानदार आहे. यातच आता केवळ २ लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून तुम्ही ही जबरदस्त कार घरी नेऊ शकता.
6 / 9
Tata Tigor EV ची किंमत १२.४९ लाख रुपये आहे. जर टाटा टिगोर इलेक्ट्रिक XM ला फायनान्स करीत असाल, तर २ लाख रुपयाचे डाउन पेमेंट नंतर तुम्हाला जवळपास १०.५ लाख रुपये लोन मिळेल. ८ टक्के व्याज दराने तुम्हाला पुढील ५ वर्षांपर्यंत २१ हजार २९१ रुपये ईएमआय रुपाने द्यावे लागेल.
7 / 9
Tata Tigor EV Z+ व्हेरियंटची किंमत १२.९९ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. जर तुम्ही टाटा टिगोर ईव्ही एक्सझेड प्लस व्हेरियंट लोन वर खरेदी केल्यास तसेच तुम्ही २ लाख रुपये डाउन पेमेंट केले असल्यास तुम्हाला ८ टक्के व्याज दराने ५ वर्षांसाठी ११ लाख रुपये लोन मिळेल. पाच वर्षांसाठी दर महिना २२ हजार ३०५ रुपये ईएमआय द्यावा लागेल.
8 / 9
Tata Tigor EV Z+ DT व्हेरियंटची किंमत १३.१४ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. तुम्ही टिगोर इलेक्ट्रिकच्या या मॉडलला फायनान्स करीत असाल तर तुम्हाला २.०४ लाख रुपये डाउन पेमेंट करावे लागेल. यानंतर ११.१० लाख रुपये लोन मिळेल. यावर ८ टक्के व्याज दराच्या हिशोबाप्रमाणे ५ वर्षासाठी तुम्हाला २२ हजार ५०७ रुपये ईएमआय द्यावा लागेल.
9 / 9
Tata Tigor EV च्या सर्व व्हेरिएंटची किंमत संबंधित राज्यातील कर आणि अन्य बाबींमुळे बदलणारी असून, तुमच्या शहरातील जवळच्या टाटा मोटर्स शोरूममध्ये जाऊन या कारची सविस्तर माहिती घेणे तुमच्यासाठी गरजेचे आणि आवश्यक ठरेल, असा सल्ला दिला जात आहे.
टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार