शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Nano EV: सामान्यांसाठी आनंदाची बातमी! Tata Nano इलेक्ट्रिक अवतारात परतणार; खिशाला परवडणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 5:06 PM

1 / 8
Tata Nano Electric Avatar: काही वर्षांपूर्वी Tata मोटर्सने आपल्या सर्वात स्वस्त Nano कारला बाजारात लॉन्च केले होते. या गाडीच्या घोषणेपासून भारतीय ग्राहकांमध्ये या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता होती. कमी बजेट असलेल्या ग्राहकांना ही कार खूप आवडेल, अशी आशा कंपनीला होती.
2 / 8
पण, ही कंपनीची अयशस्वी गाडी ठरली आणि कंपनीला याचे प्रोडक्शन बंद करावे लागले. आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात येत आहे की, कंपनी नॅनोला परत बाजारात आणणार आहे. पण, यंदा नॅनो पेट्रोल-डिझेल नव्हे तर इलेक्ट्रिक अवतारात (Tata Nano Electric Version) येणार आहे.
3 / 8
TOIच्या रिपोर्टनुसार, काही ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीच्या सूत्रांनी सांगितले की, कंपनी काही बदलांसह Nano ला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च करणार आहे. यात सस्पेंशनपासून टायरपर्यंत, अनेक गोष्टी बदलल्या जाणार आहेत.
4 / 8
Tata Nanoला जानेवारी 2008 मध्ये लॉन्च केले होते. परंतू, या गाडीला ग्राहक न भेटल्याने टाटाने मे 2018 मध्येच कारचे उत्पादन बंद केले.
5 / 8
कंपनीने आधीच Curvv आणि Avinya सारख्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. टाटा पुढील 5 वर्षात 10 इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च करण्याच्या विचारात आहे.
6 / 8
टाटा संसचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी 77व्या एजीएममध्ये सांगितले होती की, कंपनीने आर्थिक वर्ष 21 मध्ये 5,000 आणि 22 मध्ये 19,500 EVची विक्री केली होती. तर, या वर्षाच्या अखेरपर्यंत 50 हजार EV विकण्याचे टार्गेट होते.
7 / 8
विशेष म्हणजे, कंपनीची Tata Nexon EV देशातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने आतापर्यंत या SUVचे 35 हजार यूनिट्स विकले आहेत.
8 / 8
नुकतेच टाटा मोटर्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर विक्रीचे आकडे शेअर केले होते. कंपनीकडे Nexon EV Prime, Nexon EV Max सह Tigor EV आणि Tiago EV उपलब्ध आहे.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन