tata nexon available with mega discount on this month know about all details
Tata Nexon वर मिळतोय बंपर डिस्काऊंट! ५ स्टार रेटिंगसह भन्नाट फिचर्स; देशात नंबर १ कायम By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 1:21 PM1 / 9TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या आताच्या घडीला दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, तर शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. कोरोना संकट कालावधीत भारतीयांचा टाटांवरील विश्वास अनेक पटीने वाढल्याचे सांगितले जात आहे.2 / 9TATA ग्रुपमधील Tata Motors कंपनी लागोपाठ आपली नवीन उत्पादने लाँच करत आहे. टाटा मोटर्सचा भारतीय बाजारातील वाहन विक्रीतील शेअर कमालीचा वाढला असून, गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यांत टाटा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. याशिवाय टाटाच्या अनेक कार टॉप १० मध्ये झळकत आहेत. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटाचा दबदबा कायम आहे.3 / 9Tata Motors सर्वाधिक लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात खप होणारी कार म्हणजे Tata Nexon. टाटा मोटर्सने (TATA Motors) आपल्या रांजणगाव येथील प्रकल्पात भारतातील पहिल्या GNCAP 5 स्टार रेडेट कारचा आनंद साजरा केला. तसेच यावेळी कंपनीने ३ लाख नेक्सॉन (TATA Nexon) रोलआऊट केल्या.4 / 9टाटाची लोकप्रिय Tata Nexon एसयूव्ही इंडियाची सर्वांत जास्त विकणारी एसयूव्ही आहे. जर, तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर टाटा तुम्हाला या महिन्यात शानदार ऑफर देत आहे. या कारचा लूक आणि परफॉर्मन्स जबरदस्त आहे.5 / 9Tata Nexon चे जर तुम्हाला या महिन्यात डिझेल इंजिन व्हेरियंट खरेदी करायचे असेल, तर तुम्ही याला एक्सचेंज बोनस रूपाने १५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटवर खरेदी करू शकता. तर कॉर्पोरेट खरेदीदारांना १० हजार रुपयाचा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे.6 / 9Tata Nexon ला Global NCAP रेटिंग्समध्ये ५ स्टार स्कोर मिळाला आहे. बेजोड फीचर्सच्या जोरावर ही कार इंडियाची नंबर वन एसयूव्ही बनली आहे. जारी झालेल्या बेस्ट सेलिंगच्या लिस्टमध्ये ही कार एसयूव्ही सेगमेंटची नंबर वन कार होती. 7 / 9Tata Nexon सरासरी देशातील ५ वी सर्वांत जास्त विकणारी कार आहे. सर्व व्हेरिएंटची योग्य माहिती आणि त्यावरील ऑफर जाणून घेण्यासाठी जवळच्या शोरुमला भेट द्यावी, असे सांगितले जात आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशीपकडे जाऊन सविस्तर माहिती करून घेऊ शकता, असा सल्ला दिला जात आहे. 8 / 9Tata Nexon या एसयूव्हीमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS),ऑटो AC, टायर प्रेशन मॉनिटरिंग, क्रूज कंट्रोल, डुअल फ्रंट एयरबॅग, रियर पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, चाइल्ड सीट ISOFIX, स्पीड अलर्ट सिस्टम यांसारखे खास फीचर्स दिले आहेत.9 / 9Tata Nexon कार इलेक्ट्रिक पर्यायतही उपलब्ध असून, लवकरच सीएनजीमध्ये भारतीय बाजारात दिसू शकते, असे सांगितले जात आहे. एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Tata Nexon ने विक्रीच्या बाबतीत मोठी आघाडी घेतली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications