Tata Motors चा मोठा विक्रम; अवघ्या 4 दिवसात Nexon EV ने केला 4,000 KM प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 8:17 PM1 / 7Tata Nexon EV : गेल्या काही महिन्यांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांच्या मागणीमुळे कंपन्याही मोठ्या प्रमाणावर आपले उत्पादन वाढवत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांची ड्रायव्हिंग रेंज आणि लाँग ड्राईव्हबाबत ग्राहकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत. 2 / 7 अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही Tata NEXON EV ने मोठी कामगिरी केली आहे. Tata Nexon EV ने काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करण्याचा विक्रम केला आहे.3 / 7 Tata NEXON EV ने अवघ्या 4 दिवसात हा विक्रम केला आहे. टाटा मोटर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सॉनने काश्मीर ते कन्याकुमारी हा 4 दिवसांत (95 तास 46 मिनिटांत) 4003 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. या विक्रमासाठी या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदवले गेले आहे.4 / 7 भारतीय महामार्गांवर असलेल्या सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कमुळे ही नॉन-स्टॉप ड्राइव्ह शक्य झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एकूण 28 तास खर्च करून आणि संपूर्ण प्रवासादरम्यान फास्ट चार्जिंगसाठी फक्त 21 थांबे असल्याने, Nexon EV संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी केवळ वेळच वाचवत नाही, तर नियमित इंधन (ICE) वाहनांच्या तुलनेत खर्चातही लक्षणीय बचत करते.5 / 7 कंपनीचा दावा आहे की, या लाँग ड्राईव्हदरम्यान नेक्सॉन EV इतर कारप्रमाणेच आव्हानात्मक भूभाग आणि अत्यंत बिकट हवामानाच्या परिस्थितीतून चालवण्यात आली. या संपूर्ण प्रवासादरम्यान या इलेक्ट्रिक एसयूव्हीने सरासरी 300 किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज प्रदान केली आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, सर्वात वेगवान K2K ड्राइव्ह व्यतिरिक्त Nexon EV ने 23 रेकॉर्ड बनवले.6 / 7 या यशस्वी लाँग ड्राईव्हबद्दल टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे एमडी शैलेश चंद्र म्हणाले, “नेक्सॉन ईव्हीने इलेक्ट्रिक वाहनांद्वारे सर्वात वेगवान K2K ड्राइव्हसाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.'' 7 / 7 ते पुढे म्हणाले, 'हे यश या एसयूव्हीच्या अफाट क्षमतेचा आणि देशभरातील चांगल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेचा पुरावा आहे. 75kms -100kms दरम्यान नियमित अंतराने एक फास्ट चार्जिंग स्टेशन होते, ज्यामुळे हे काम सहज शक्य झाले.'' आणखी वाचा Subscribe to Notifications