शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cheapest Best Selling Cars : 'या' तीन गाड्यांचाच बोलबाला, सर्वाधिक मागणी; मायलेज दमदार किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 3:14 PM

1 / 7
टाटा (TATA), ह्युंदाई (Hyundai), मारुती (Maruti Suzuki) या कंपन्याच्या गाड्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या गाड्यांची विक्रीही चांगली झाली आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या एसयूव्ही कार्स याच कंपन्यांच्या आहेत.
2 / 7
टाटा नेक्सॉन (TATA Nexon) ही मार्च महिन्यात एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. या कारच्या १४,३१५ युनिट्सची विक्री झाली आहे. टाटासाठी ही सर्वाधिक विक्री होणारी कारही ठरली आहे. याचं क्रॅश टेस्ट रेटिंग,केबिन स्पेस आणि ओव्हऑल पॅकेजिंग या कारला बेस्ट ऑप्शन बनवते.
3 / 7
टाटा नेक्सॉन (TATA Nexon) ही मार्च महिन्यात एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. या कारच्या १४,३१५ युनिट्सची विक्री झाली आहे. टाटासाठी ही सर्वाधिक विक्री होणारी कारही ठरली आहे. याचं क्रॅश टेस्ट रेटिंग,केबिन स्पेस आणि ओव्हऑल पॅकेजिंग या कारला बेस्ट ऑप्शन बनवते.
4 / 7
मारुती सुझुकीची कार (Maruti Suzuki) विटारा ब्रेझा मार्च २०२२ मध्ये १२ हजार ४२९ युनिट्सच्या विक्रीनंतर लिस्टमध्ये सर्वाधिक विक्री होणारी दुसरी एसयुव्ही आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ह्युंदाई क्रेटा, वेन्यू आणि टाटा पंचनंतर ९,५९२ युनिट्सची विक्री करत पाचवी सर्वात मोठी विक्री झालेली एसयुव्ही होती.
5 / 7
परंतु मार्च महिन्यात या गाडीनं सर्वांना मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. मारुती सुझुकी विटाराचं मायलेज १७.०३ ते १८.७६ किमी / लिटर आहे. ऑटॉमॅटिक पेट्रोल व्हेरिअंटचं मायलेज १८.७६ किमी / लिटर आहे. मॅन्युअल पेट्रोल व्हेरिअंटचं मायलेज १७.०३ किमी / लिटर आहे. या कारची किंमती ८.६१ लाख एक्स शोरुमपासून सुरू होते.
6 / 7
Hyundai Creta ही गेल्या महिन्यात तिसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV होती आणि मार्च २०२२ मध्ये १०,५२६ युनिट्सची विक्री करत या कंपनीनं आपलं तिसरं स्थान कायम ठेवलं आहे, तथापि, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १७ टक्क्यांनी घट झाली आहे.
7 / 7
दरम्यान, नवी IMT नाईट एडिशन ही विक्री थोडी वाढवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रेटाची किंमत १०.२३ लाखांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची किंमत १८.०१ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. क्रेटा डिझेल मॅन्युअल मायलेज २१.४ किमी / लिटर आहे. त्याच वेळी, क्रेटा पेट्रोल मॅन्युअलचे मायलेज १६.८ किमी / लिटर आहे.
टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीHyundaiह्युंदाई