Tata Nexon XZ Variant launches in India
टाटा कंपनीची Tata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 2:09 PM1 / 5नवी दिल्ली : Tata Motors मोटर्सने आपल्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूवी Nexon व्हेरिएंटमध्ये विस्तार केलाय. कंपनीने Tata Nexon XZ व्हेरिएंट भारतात केली आहे.2 / 5Tata Nexon XZ मध्ये एलईडी डे-टाइम रनिंग लाईट, फ्रंट फॉग लॅम्प, रिअर फॉग लॅम्प, अलॉय व्हील, रिअर डिफॉगर, स्प्लिट फोल्डिंग रिअर सीट, सेंटर कंट्रोल, फ्रंट आर्मरेस्ट, स्मार्ट की, पुश स्टार्ट/स्टॉप बटन आणि रिअर सेंटर आर्म रेस्टसारखे फीचर्स दिले नाहीत. 3 / 5ही कार ड्युअल टोन कलर स्कीममध्ये मिळणार असून ही एसयूवी ५ रंगामध्ये उपलब्ध होईल. Tata Nexon मध्ये १.२ लिटर Revotron टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर Revotorq टर्बो डिझेल इंजिनचा पर्याय आहे. 4 / 5या व्हेरिएंटच्या पेट्रोल इंजिनची दिल्ली एक्स - शोरूम किंमत ७. ९९ लाख रुपये आणि डिझेल इंजिनाची किंमत ८.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 5 / 5Tata Nexon XZ कारच्या लाँच वेळी टाटा मोटर्सचे हेड-मार्केटिंग विवेक श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही नवनवीन प्रॉडक्ट तयार करण्यासोबतच आमच्या ब्रँडला आणखी मजबूत करण्यावरही भर देत आहोत. आणखी वाचा Subscribe to Notifications