शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Nexon: 'या' प्रसिद्ध EV कारच्या बॅटरीची किंमत ऐकून बसेल धक्का, या किमतीत येईल नवी कोरी कार...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 4:49 PM

1 / 8
Tata Nexon: टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक कार सेगमेंटमधील सर्वात मोठी कंपनी आहे. Tata Nexon EV ही सर्वाधिक विक्री होणारी EV कार आहे. गेल्या महिन्यात, नेक्सॉन आणि टिगोरने ईव्ही सेगमेंटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. आता तुम्हीही Tata Nexon EV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा आणि ही बातमी वाचा.
2 / 8
भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या Nexonची बॅटरी आणि मोटरची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. कर्नाटकातील एका व्यक्तीने Nexon EV ची बॅटरी आणि मोटरच्या किमतीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
3 / 8
हा व्यक्ती एका नेक्सॉन ईव्हीचा मालक असून, त्याने शेअर केलेल्या पोस्टनुसार, Nexon ची बॅटरी तब्बल 4,47,489 रुपयांची आहे. विशेष म्हणजे, Nexon EV Max ची सुरुवात 17.74 लाख रुपयांपासून होते.
4 / 8
कर्नाटकातील एका व्यक्तीने त्याच्या कारच्या बॅटरीवरील किंमतीचा फोटो शेअर केला आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी गाडी घेतली असून, या इलेक्ट्रिक कारने आतापर्यंत 68,000 किमी अंतर कापले आहे.
5 / 8
यामुळे त्याच्या बॅटरीवर परिणाम झाला असून, त्याने याबाबत कंपनीलाही तक्रार केली. कंपनी Nexon EV च्या बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1.6 लाख किमीची वॉरंटी देत ​​आहे. याआधी काही अडचण आल्यास कंपनी मोफत बॅटरी बदलून देते.
6 / 8
कंपनीने त्या व्यक्तीला वॉरंटीमुळे Tata Nexon EV ची जुनी बॅटरी बदलून नवीन बॅटरी दिली आहे. कंपनीने बॅटरीचे बिल मालकाला दिले, ज्यामध्ये त्याची किंमत 4,47,489 रुपये होती. 'ट्रॅक्शन मोटर असेंब्ली'साठी ही एमआरपी आहे.
7 / 8
ही बॅटरी एप्रिल 2022 पॅकिंगची आहे. ही बॅटरी भारतात बनवण्यात आली आहे. म्हणजेच, जर नेक्सॉन ईव्हीच्या बॅटरीमध्ये वॉरंटीनंतर समस्या आली, तर तुम्हाला ती दुरुस्त करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल.
8 / 8
ही बॅटरी एप्रिल 2022 पॅकिंगची आहे. ही बॅटरी भारतात बनवण्यात आली आहे. म्हणजेच, जर नेक्सॉन ईव्हीच्या बॅटरीमध्ये वॉरंटीनंतर समस्या आली, तर तुम्हाला ती दुरुस्त करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कार