tata punch now second best selling tata car within 12 days of launch know more details and price
केवळ १२ दिवसांत TATA च्या 'या' कारनं केली जबरदस्त कमाल, बनली दुसरी बेस्ट सेलिंग कार By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 5:41 PM1 / 13टाटा मोटर्सकडून नुकत्याच लाँच झालेल्या नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीने जबरदस्त कामगिरी केली आहे. टाटाच्या या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीचं नाव टाटा पंच आहे. हे टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये ही कार नेक्सॉनच्या खाली आहे आणि आता कंपनीच्या भारतातील सर्वात लहान स्पोर्ट्स युटिलिटी वाहन आहे. 2 / 13टाटा पंचची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.49 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 9.09 लाख रुपये आहे. अधिकृत लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांतच, टाटा पंच कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.3 / 13टाटा पंच भारतात 18 ऑक्टोबर 2021 रोजी लाँच करण्यात आली आणि त्यानंतर या सबकॉम्पॅक्ट SUV च्या प्री-बुक केलेल्या युनिट्सची ताबडतोब डिलिव्हरी सुरू झाली. गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये टाटा मोटर्सने टाटा पंचच्या 8,453 युनिट्सची भारतात विक्री केली.4 / 13ऑक्टोबरमध्ये टाटा मोटर्सची ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. 10,096 युनिट्सची विक्री करून टाटा नेक्सॉन विक्रीच्या चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. Tata Nexon ने वर्षभरात 95 टक्के वाढ साधली आहे.5 / 13टाटा पंच BS6 ही कार 1.2-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते. सब-कॉम्पॅक्ट SUV चे इंजिन 85hp पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करते. टाटा पंच ही कार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटीशीसह येते. 6 / 13टाटा पंच स्टार्ट/स्टॉप फंक्शनसह येतो. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये टाटा पंचने अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ही सब-कॉम्पॅक्ट SUV 7.0-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येते. टाटा पंच ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑटो-फोल्डिंग ORVM, 6 स्पीकरसह देण्यात आले आहेत.7 / 13Tata Punch ची परवडणारी किंमत, लेटेस्ट आणि सेगमेंट फर्स्ट फीचर्स, आकर्षक डिझाईन आणि देशातील सर्वात सुरक्षित कार म्हणून ग्राहकांनी या कारला जबरदस्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.8 / 13टाटा पंचमध्ये एबीएस सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोलची सुविधा असणार आहे. याशिवाय टाटा पंचमध्ये दोन एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. इंजिनमध्ये Ram-Air Technology चा वापर केला आहे. यामुळे कार टॉप स्पीडवर खूप चांगलं मायलेज देऊ शकेल.9 / 13मायक्रो एसयूव्हीला १६ इंचाचे टायर्स आणि तब्बल १८७ एमएम ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे. तर कारचे चारही दरवाचे ९० अंशापर्यंत उघडणारे असणार आहेत. जेणेकरुन कारमध्ये सहजपणे प्रवेश करता येईल.10 / 13टाटा पंचची सर्वात महत्त्वाची बाब अशी की, ग्लोबल एजंसी एनकॅपमध्ये टाटा पंच कारला सुरक्षेच्या बाबतीत फाइव्ह स्टार रेटिंग मिळालं आहे. एडल्ट सेफ्टीवर टाटा पंचला १७ पैकी १६.४५ गुण मिळाले आहेत. तर चाइल्ड ऑक्यूमेंट सेफ्टीच्या बाबतीत ४९ पैकी ४०.८९ गुण मिळाले आहेत.11 / 13टाटा पंचच्या सेगमेंटमध्ये ही कार प्रतिस्पर्धी कंपन्यांना जोरदार टक्कर देणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या कारचं डिझाइन तयार करण्यात आलं आहे. कंपनीनं ४ ऑक्टोबर रोजी टाटा पंचमध्ये मिळणाऱ्या फिचर्सची सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांचं लक्ष या जबरदस्त कारनं वेधून घेतलं होतं.12 / 13टाटा मोर्टर्सनं तयार केलेल्या या अत्याधुनिक मायक्रो एसयूव्हीच्या आकर्षक डिझाइननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शहरी भागासाठी टाटा पंच एक कॉम्पॅक्ट डिझाइन ठरणार आहे. तर ऑफरोड भागातही टाटा पंच एक बहुपयोगी कार ठरणार आहे. कारण यात जबरदस्त ग्राऊंड क्लिअरन्स आणि चांगला व्हील बेस दिला आहे.13 / 13या कारमध्ये कस्टमाईज्ड पॅकही घेता येणार आहे. कस्टमाइज पॅकची किंमत Pure व्हेरिअंट + रिदम पॅक: ३५,००० रुपये, Adventure व्हेरिअंट + रिदम पॅक: ३५,००० रुपये, Accomplished व्हेरिअंट + डेझल पॅक: ४५,००० रुपये, तर Creative व्हेरिअंट + IRA: ३०,००० रुपये आणखी वाचा Subscribe to Notifications