शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA Punch On EMI : पाच-सहा नाही, तर एक लाखात घरी न्या टाटा पंच, द्यावा लागेल केवळ इतका ईएमआय; समजून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 1:08 PM

1 / 9
Tata Punch Down Payment & EMI Calculator: जर तुम्ही टाटा मोटर्सची कार पंच घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा वेटिंग पिरिअड लागेल. टाटा पंचच्या बेस व्हेरिएंट प्योअरची किंमत 5,99,900 रुपये आहे. तर दुसरीकडे याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
2 / 9
अशा परिस्थितीत तुम्ही ही मिनी एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात, परंतु तुमचे बजेट कमी आहे तरी काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला 20 टक्के डाउन पेमेंटनंतर किती EMI देऊन ही कार खरेदी करू शकता याचे गणित सांगत आहोत. टाटा मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये मिनी एसयूव्ही पंच लाँच केली होती.
3 / 9
प्रत्येक बँका ऑटो लोनवर निरनिराळे व्याज आकारतात. स्टेट बँक ऑफ इंडिया कार लोनसाठी 8.45 टक्क्यांचे किमान व्याजदर आकारते. परंतु 5 वर्षांचा कालावधी आणि सात वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदर वेगवगळे असू शकतात. तसंच व्याजदर हे संबंधित ग्राहकांच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असते.
4 / 9
जर तुम्ही एक्स शोरुम किंमतीवर 20 टक्क्यांचे डाऊन पेमेंट करून उर्वरित अमाऊंट तुम्ही लोन म्हणून घेऊ शकता. तुम्हाला 8.45 टक्के व्याजदरानं पाच वर्षांच्या कालावधीसाठी किती ईएमआय द्यावा लागेल हे पाहूया.
5 / 9
टाटा पंचच्या बेस व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 5,99,900 रुपये आहे. 20 टक्क्यांनुसार याचं डाऊनपेमेंट 1,19,980 रुपये होतं. या कारची ऑनरोड किंमत 7.13 लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास 5,93,020 लाखांचं लोन घ्यावं लागेल.
6 / 9
तुम्ही इतकं डाऊनपेमेंट केल्यानंतर 5 वर्षांसाठी तुम्हाला 8.45 टक्क्यांच्या व्याजदरानुसार 5,93,020 कर्ज घ्यावं लागेल. पाच वर्षांसाठी तुम्हाला यासाठी 12152 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. तसंच व्याजाच्या रुपात पाच वर्षांसाठी तुम्हाला 136126 रुपये द्यावे लागतील.
7 / 9
टाटा पंचमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन देण्यात आले आहे. त्याचे इंजिन 6000 rpm वर 86 PS ची कमाल पॉवर आणि 3300 rpm वर 113 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलाय. याशिवाय ग्राहकांना यामध्ये 5-स्पीड एएमटीचा पर्यायही मिळतो. टाटा पंच मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 18.97 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 18.82 kmpl मायलेज देते.
8 / 9
टाटा पंच मध्ये 7 इंच टचस्क्रीन सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक आणि क्रूझ कंट्रोल यासारखे फीचर्स देण्यात आलेत. टाटा पंच भारतातील टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या यादीमध्ये सातत्याने सामील झाली आहे.
9 / 9
सुरक्षिततेच्या दृष्टीने, Tata Panch ला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग देण्यात आलेय. Tata Nexon आणि Tata Altroz ​​नंतर, Tata Panch ला आता ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. Tata Punche ला ग्लोबल NCAP मध्ये ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 5 स्टार (16,453) आणि चाईल्ड प्रोटेक्शनसाठी 4 स्टार (40,891) रेटिंग देण्यात आलेय.
टॅग्स :Tataटाटाcarकार