शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ ३० हजार रूपयांत करा Tata Safari बुक; पाहा कधी होणार SUV लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 8:10 PM

1 / 10
Tata Safari आता नव्या रुपात पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत येणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं या SUV ची एक झलक दाखवली होती.
2 / 10
परंतु आता कंपनीनं या कारचं बुकिंग सुरू केलं आहे. केवळ ३० हजार रूपयांमध्ये ग्राहकांना ही कार बुक करता येणार आहे.
3 / 10
दरम्यान ही कार २२ फेब्रुवारी रोजी लाँच केली जाणार आहे. तसंच याच दिवसापासून या कारची डिलिव्हरीही सुरू केली जाईल.
4 / 10
टाटा सफारी ही कार टाटा मोटर्सच्या इम्पॅक्ट २.० डिझाईन लँगवेजवर बेस्ड असणार आहे. याव्यतिरिक्त टाटा सफारीमध्ये कंपनी OMEGARC प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे.
5 / 10
या कारमध्ये ओयस्टर व्हाईट थीम असलेलं इंटिरिअर देण्यात आलं आहे. तसंच अॅशवूड डॅशबोर्डही देण्यात आला आहे.
6 / 10
याव्यतिरिक्त कारमध्ये फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट असेल. तसंच त्याचा Apple CarPlay आणि Android Auto लादेखील सपोर्ट करेल.
7 / 10
New Tata Safari मध्ये स्टेप्ड रूफ असेल. ऑटो एक्स्पो २०२० मध्ये टाटा सफारीला ग्रॅव्हिटास या कोडनेमनं शोकेस करण्यात आलं होतं.
8 / 10
टाटा सफारीमध्ये २.० लिटर, ४ सिलिंडर इंजिन असण्याची शक्यता आहे. जे १७० बीएचपी पॉवर आणि ३५० एनएमचा टॉर्क जनरेट करते.
9 / 10
तसंच याव्यतिरिक्त या कारमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त सफारीमध्ये टर्बो पेट्रोल इंजिन आणि त्यासोबतच DCT गिअरबॉक्स असण्याचीही शक्यता आहे.
10 / 10
टाटा सफारी नव्या जनरेशनच्या Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांना टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनauto expoऑटो एक्स्पो 2020carकार