शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

500 km रेंज अन्...लवकरच लॉन्च होणार Tata ची नवीन EV कार, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:16 IST

1 / 8
Tata Sierra EV Launching: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. कंपन्याही आपल्या लोकप्रिय मॉडेल्सचे EV व्हेरिएंट लॉन्च करत आहेत. सध्या भारतीय EV सेगमेंटमध्ये Tata Motors चे वर्चस्व आहे.
2 / 8
2024-25 या आर्थिक वर्षात भारतात विकल्या गेलेल्या एकूण इलेक्ट्रिक कारपैकी 50% पेक्षा जास्त फक्त टाटाच्या कार आहेत. आता ही पकड आणखी वाढवण्यासाठी टाटा मोटर्स त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही Tata Sierra EV लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
3 / 8
विशेष म्हणजे, टाटा आपल्या नवीन Sierra EV सोबतच पेट्रोल आणि डिझेल इंजिनवाले व्हेरिएंटदेखील लॉन्च करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, Tata Sierra EV सिंगल चार्जवर 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देईल.
4 / 8
डिझाईन आणि एक्सटीरिअर फिचर्स - Tata Sierra EV पहिल्यांदा जानेवारी 2025 मध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये दाखवण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार 2025 च्या दिवाळीपर्यंत लॉन्च केली जाऊ शकते.
5 / 8
कारच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले, ही खूपच आधुनिक आणि प्रीमियम असेल. या एसयूव्हीमध्ये ब्लॅक फिनिश रुफलाइन, पॅनोरॅमिक सनरुफ, रॅपअराउंड ग्लास इफेक्ट आणि फ्लोटिंग रुफसारखे आकर्षक फिचर्स मिळतील.
6 / 8
500 किमीची रेंज- टाटा सिएराच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात दोन इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. एक 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि दुसरे 2.0 लिटर डिझेल इंजिन मिळेल.
7 / 8
तर, त्याचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा सिएरा ईव्ही एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 500+ किलोची रेंज देऊ शकेल. अद्याप कंपनीने या कारची लॉन्चिंग डेट आणि किमतीबाबत कुठलीही माहिती उघड केलेली नाही.
8 / 8
टाटा सिएरा भारतीय बाजारपेठेत आल्यावर ह्युंदाई क्रेटा 2024, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारासारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल. या सर्व एसयूव्ही त्यांच्या संबंधित विभागांमध्ये मजबूत ब्रँड व्हॅल्यू, प्रीमियम फीचर्स आणि विश्वासार्ह इंजिनसाठी ओळखल्या जातात.
टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनTataटाटा