शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Tiago launch: टाटाचा धमाका! आज लॉन्च करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या, किती असू शकते किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 11:23 AM

1 / 7
टाटा मोटर्स (Tata Motors) इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) सेगमेंटमध्ये आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. आज कंपनी आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो (Tata Tiago Electric) लॉन्च करत आहे. देशातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेता कंपनी बाजारातील आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळेच कंपनी टियागो हॅचबॅकला इलेक्ट्रिक व्हेरिअंटमध्ये बाजारात आणत आहे.
2 / 7
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉन आणि टिगोर या दोन कार आधीपासूनच आहेत. भारतीय बाजारात तर नेक्सॉन इलेक्ट्रिकची जबरदस्त विक्री होत आहे. आता Tiago लॉन्च करून, कंपनी हॅचबॅक इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही आपला दबदबा निर्माण करत आहे. टाटा मोटर्सने पुढील पाच वर्षांत 10 इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. टियागो इलेक्ट्रिक हेही यांपैकीच एक आहे.
3 / 7
किती असू शकते किंमत - टाटा टियागो इलेक्ट्रिकच्या किमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, हिची किंमत 10 लाख रुपयांच्या रेंजमध्ये असू शकते. महत्वाचे म्हणजे ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल, असा दावाही कंपनीने केला आहे. याच बरोबर, ही कार सिंगल चार्जमध्ये सुमारे 300 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. हिला 26kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शखतो.
4 / 7
सर्वात स्वस्त कार - कंपनी देशांतर्गत बाजारात आधीपासूनच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक असलेल्या Tigor EV ची विक्री करत आहे. हिची किंमत 12.49 लाख रुपये एवढी आहे. तर दुसरीकडे, इतर इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्यांची किंमत 20 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे.
5 / 7
इलेक्ट्रिक मार्केटवर टाटाचा दबदबा - टाटा मोटर्सने आपल्या नेक्सन ईव्ही आणि टिगोर ईव्हीच्या जोरावर भारतात इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांच्या मार्केटमध्ये 88 टक्के एवढी हिस्सेदारी मिळवली आहे. कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये नेक्सन ईव्ही प्राइम, नेक्सन ईव्ही मॅक्स आणि टिगोर ईव्हीसह 3,845 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे.
6 / 7
चार्जिंग टाइम - नवी Tiago EV क्रुझ कंट्रोल सारख्या फीचर्ससह येण्याची शक्यता आहे. नव्या ईव्हीला चार्ज करण्यासाठीही टिगोर ईव्ही एवढाच वेळ लागू शकतो. महत्वाचे म्हणजे, टिगोर ईव्ही ही साधारणपणे 65 मिनिटांतच 0-80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
7 / 7
याशिवाय, टाटा टियागो इलेक्ट्रिक हॅचबॅक ही एका टचस्क्रीन इंफोटेनमेंट यूनिटसह येईल. तसेच, या कारमध्ये किलेस एंट्री, पॉवर विंडो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड ओआरव्हीएम, एक ऑल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्स असतील, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकार