शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Motors Tiago : टाटा अडखळत होती, धडपडत होती! तेव्हाच बाजारात आली; चार लाखांचा टप्पा गाठला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:18 PM

1 / 6
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सनं (Tata Motors) ने गुजरातमधील सानंद प्लांटमधून 4,00,000 वी टियागो (Tiago) हॅचबॅक रोल आऊट केली. विशेष म्हणजे, उत्पादनाचा हा टप्पा गाठणारे टाटा टियागो हे ब्रँडचे पहिले मॉडेल आहे. हा प्रसंग सेलिब्रेट करण्यासाठी कंपनीने देशात #Tiago4ever मोहीम सुरू केली आहे.
2 / 6
Tiago हॅचबॅक कार पहिल्यांदा 2016 च्या सुरूवातीला लाँच करण्यात आली होती. यानंतर जानेवारी 2020 मध्ये या कारचं फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणण्यात आलं. यानंतर जानेवारी 2022 मध्ये हॅचबॅक मॉडेल लाइनअपमध्ये सीएनजी व्हेरिअंट सामील करण्यात आलं.
3 / 6
Tiago मध्ये Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह 7-इंचाचा टचस्क्रीन, ऑटोमॅटिक एसी, 8-स्पीकर हरमन साउंड सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिमोट कीलेस एंट्री, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो फोल्ड ORVM, पंक्चर रिपेअर किट आणि कुल ग्लोव्ह बॉक्स देण्यात येतो.
4 / 6
फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडीसह कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, स्पीड अलर्ट सिस्टीम यांसारखे फीचर्स टियागोमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय, Tiago ला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
5 / 6
टियागो सध्या 1.2 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड रवोट्रॉन पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहेय हे इंजिन 86 PS ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायात 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिट सामील आहे. ही कार 19.8 किमी प्रति लिटरचं मायलेज देते.
6 / 6
टाटा टियागोची एक्स शओरुम किमत 5.23 लाखांपासून सुरू होऊन 7.68 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार XTA, XZA, XZA+ आणि XZA+ या चार व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. टियागोच्या सीएनजी मॉडेलची किंमत 6.19 लाख रुपयांपासून 7.68 लाख रुपयांपर्यंत आहे.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन