Tata Tiago Nrg Cng Know Full Details Of Price Variants Colors Features And Specifications
Tata Tiago NRG CNG ची मार्केटमध्ये एंट्री; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 4:16 PM1 / 7 नवी दिल्ली : टाटा मोटर्सच्या सीएनजी कारमध्ये (Tata Motors CNG Cars) आणखी एका कारचा समावेश झाला आहे. ही कार कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक टाटा टियागो एनआरजी (Tata Tiago NRG) आहे. या कारचे सीएनजी व्हर्जन कंपनीने देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे आणि तिचे नाव टाटा टियागो एनआरजी सीएनजी (Tata Tiago NRG CNG) आहे.2 / 7टाटा मोटर्सने टियागो एनआरजी सीएनजी दोन व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. पहिला व्हेरिएंट एक्सटी (XT) आणि दुसरा व्हेरिएंट एक्स झेड (XZ) आहे.3 / 7टाटा टियागो एनआरजी एक्सटी सीएनजीची सुरुवातीची किंमत 7.4 लाख रुपये आहे. या कारच्या टाटा टियागो एनआरजी एक्सझेड सीएनजी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 7.8 लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती दिल्ली एक्स-शोरूममधील आहेत. टाटा टियागो एनआरजी सीएनजी व्हेरिएंटची किंमत सध्याच्या पेट्रोल व्हेरिएंटपेक्षा 90 हजार रुपये जास्त आहे.4 / 7टाटा मोटर्सने टियागो एनआरजी सीएनजी सठी बुकिंग विंडो उघडली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा त्यांच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊन ही कार बुक करू शकतात.5 / 7टाटा टियागो एनआरजी सीएनजी सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 1199 इंजिन देण्यात आले आहे, जे तीन-सिलिंडर असलेले 1.2 लिटर रेव्होट्रॉन एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 72 पीएस पॉवर आणि 95 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीने या कारमध्ये बसवलेल्या सीएनजी किटसह i स्मार्ट टेक्नॉलॉजी दिली आहे, जी कारमध्ये सीएनजी लीक झाल्यास स्वयंचलितपणे पेट्रोलवर धावू शकेल.6 / 7टाटा टियागोमध्ये दिलेल्या फिचर्सबद्दल सांगायचे तर, यामध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग, एसी, फ्रंट यांचा समावेश आहे. पण ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडीसह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.7 / 7टाटा मोटर्सने टियागो एनआरजी सीएनजी कार 5 कलर ऑप्शनसह ऑफर केली आहे. यामध्ये अॅरिझोना ब्लू, ओव्हल व्हाइट, स्टोन ग्रे, फ्लेम रेड आणि मिडनाईट प्लम, असे ऑप्शन आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications