TATA Tiago | Petrol, CNG and Electric options, know all details
8.50 लाखांपेक्षा कमी किंमत; इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि CNGमध्ये उपलब्ध, पाहा फीचर्स... By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 5:16 PM1 / 7 पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारतात इलेक्ट्रीक (Electric) आणि सीएनगी (CNG) वाहनांची मागणी वाढत आहे. ही मागणी पाहता सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीवर भर देत आहेत. यातच आता भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असलेली टाटा(TATA)देखील सध्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्यांवर जास्त फोकस करत आहे.2 / 7 पॉवरफूल एसयूव्ही बनवण्यासाठी लोकप्रिय असलेली टाटा, आपल्या गाड्यांचे सेफ्टी फीचर्स आणि बिल्ड क्वॉलिटीसाठीही ओळखली जाते. टाटाकडे अशा अनेक गाड्या आहेत, ज्या चांगल्या मायलेजसह दमदार परफॉर्मेंसदेखील देतात.3 / 7 पण, आज आम्ही तुम्हाला टाटाच्या अशा कारबद्दल सांगणार आहोत, जी खूप खास आहे. टाटाच्या या कारमध्ये ग्राहकांना पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक, असे तिन्ही पर्याय मिळतात. या गाडीमध्ये खास फीचरदेखील पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, या गाडीची किंमत 9 लाखांपेक्षाही कमी आहे.4 / 7 आम्ही आज टाटाच्या टियागो कारबद्दल बोलत आहोत. या खास हॅचबॅक कारमध्ये चार ऑप्शन मॅन्युअल, ऑटोमॅटिक NRG आणि iCNG मिळतात. काही दिवसांपूर्वीच टाटाने या मॉडेलचे इलेक्ट्रिक व्हॅर्जन लॉन्च केले आहे. कार लॉन्च झाल्यापासून, याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पण, या तिन्ही कारच्या किमतीमध्ये मोठा फरक पाहायला मिळत आहे.5 / 7 पेट्रोल मॉडेलची किंमत- या कारच्या पेट्रोलच्या बेस मॉडेलची सुरुवाती किंमत 5,39,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. तसेच, फुल ऑटोमॅटिक पेट्रोल मॉडेलची किंमत 7,46,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.6 / 7 CNG मॉडेलची किंमत- या कारच्या सीएनजी व्हॅरेएंटबद्दल बोलायचे झाल्यास, टियागो XE CNG मॅन्युअलची किंमत 6,29,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. तसेच, याच्या टॉप मॉडेल Tiago XZ+DT ची किंमत 7,81,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.7 / 7 टाटा टियागो EV ची किंमतस- काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या टाटा टियागो EVची किंमत 8.49 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 11.79 लाखांपर्यंत जाते. टाटा टियागो EV 7 व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications