TATA tigor Electric Car will run 350Km once charged See how much it costs and features
एकदा चार्ज केल्यानंतर 350Km धावणार TATA ची 'ही' Electric Car; पाहा किती आहे किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 1:55 PM1 / 15इलेक्ट्रीक कार्सकडे लोकांचा आकर्षण सध्या वेगानं वाढताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक सध्या इतर पर्यायांकडे वळत आहेत. 2 / 15आता अशा परिस्थितीत, वाहन उत्पादक देखील पारंपारिक इंधनावरील अवलंबत्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या, अनेक देशांतर्गत कंपन्या आहेत ज्या इलेक्ट्रीक वाहनांवर वेगानं कामही करत आहेत.3 / 15टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स देशांतर्गत बाजारात लवकरच सादर करण्याच्या तयारीत आहेत. 4 / 15अलीकडेच, TATA Motors नं आपल्या इलेक्ट्रीक सेडान कार Tigor EV वरून पडदा उचलला आहे आणि या कारचे बुकिंग देखील सुरू करण्यात आलं आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रादेखील नवे इलेक्ट्रीक मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहेत. 5 / 15Nexon EV नंतर कंपनीकडून सादर करण्यात येणारी ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. आतापर्यंत टिगोर इलेक्ट्रीक सरकारी कार्यालयं आणि फ्लिट ऑपरेटरसाठी उपलब्ध होती. परंतु आता ही कार सर्वसामान्य ग्राहकांसाठीही सादर करण्यात आली आहे.6 / 15काही दिवसांपूर्वी कंपनीनं या कारबाबत माहिती दिली होती. परंतु या कारच्या ड्रायव्हिंग रेंजबाबत माहिती देण्यात आली नव्हती. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार ही इलेक्ट्रीक सेडान कार सिंगल चार्जमध्ये 350 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते असं सांगण्यात येत आहे.7 / 15आगामी ३१ ऑगस्टपासून या कारची विक्री सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान ही कार लाँच पूर्वीच डीलरशीपमध्ये पोहोचण्यास सुरूवात झाली आहे. 8 / 15कंपनीचं म्हणणं आहे की ही कार 300 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल, पण नेमक्या आकड्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्टमध्ये, या कारची काही छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत.9 / 15यात कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये हे दिसून येतं की या कारने 200 किलोमीटर पर्यंत प्रवास केला आहे आणि या दरम्यान बॅटरी जवळपास 59 टक्के शिल्लक आहेत. या अर्थानं असं म्हणता येईल की ही कार 350 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.10 / 15 या कारची इलेक्ट्रिक मोटर 75hp पॉवर आणि 170Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही कार 0 ते 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 5.7 सेकंदात पकडू शकते. 11 / 15नवीन Tigor EV साठी सर्वात मोठे अपडेट पॉवरट्रेन फ्रंटवर दिसत आहे, जे आता कंपनीच्या Ziptron EV पॉवरट्रेननं सुसज्ज आहे.12 / 15कंपनीनं या कारमध्ये 26kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे. बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रीक मोटरसाठी IP67 रेटिंग देखील देण्यात आले आहे. नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानासह, टिगोर इव्ही आता फास्ट चार्जिंगसह येते. 13 / 15फास्ट चार्जरमुळे, Tigor EV फक्त 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. टाटा मोटर्स या कारच्या बॅटरी आणि मोटरसह 8 वर्षे किंवा 1,60,000 किमी पर्यंतची वॉरंटीदेखील देत आहे. ही कार ३१ ऑगस्ट रोजी विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल. 14 / 15या क्षेत्रातील जाणकारांच्या मते या कारची किंमत 13.99 लाख रूपये ते 16.85 लाख रूपयांच्या दरम्यान असू शकते. ही स्टँडर्ड पेट्रोल व्हर्जन टिगोरच्या तुलनेत महाग आहे.15 / 15कंपनीची इलेक्ट्रीक कार स्टँडर्ड पेट्रोल व्हर्जन टिगोरच्या तुलनेत जवळपास १.५ लाख ते २ लाखांच्या दरम्यान असू शकते. याची किंमत टिगोरपेक्षा 1.5 लाख ते 2 लाखांपर्यंत अधिक असू सरके. याची सुरूवातीची किंमत 7.81 लाख आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications