शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटा टिगॉरची फेसलिफ्ट वर्षभरातच लाँच...काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 3:10 PM

1 / 5
टाटा कंपनीने टियागोची कॉम्पॅक्ट सेदान कार टिगॉर लाँच करून वर्ष होत नाही तोच तिची फेसलिफ्ट लाँच केली आहे. याला कारण आहे, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी त्यांची फेसलिफ्ट कार या वर्षी लाँच केल्याचे. नव्या टिगॉरमध्ये डिझाईन तेच असले तरीही काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.
2 / 5
टाटाने आपल्या कारसाठी नुकतीच अभिनेता हृत्विक रोशनची ब्रँड अॅम्बॅसिडरम्हणून नियुक्ती केली आहे. टियागोने टाटाला पुन्हा बाजारात स्थान दिल्यानंतर कंपनीने सेदान आणली होती. मागील आठवड्यातच टियागोची क्रॉस कार बाजारात आणली होती. यापूर्वी नेक्सॉन क्रेझ हे मॉडेल लाँच केले होते.
3 / 5
टाटाने नव्या टिगॉर कारमध्ये बाहेरील बाजुला मोठे बदल केले आहेत. पुढील ग्रील नवीन देण्यात आले असून डायमंड शेप क्रोम ग्रील आहे. तसेच नवीन डबल बॅरल हेडलँप प्रोजेक्टर लेन्ससह देण्यात आले आहेत. तसेच फॉग लँपलाही क्रोमलूक देण्यात आला आहे. शॉर्क फिन अँटेना आणि 36 एलईडी बल्ब असलेली स्टॉप लाईट देण्यात आली आहे. तसेच क्रिस्टलसारखे मागील लाईट देण्यात आले आहेत. डोअर हँडलवर क्रोम असेंट आणि 15 इंचाचे ड्युअल टोन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
4 / 5
आतल्या भागात ड्युअल टोन इंटेरिअर देण्यात आले आहे. तसेच एअर व्हेंन्ट आणि म्युझिक सिस्टिमला क्रोम बॉर्डर देण्यात आली आहे. मात्र, सीट लेदरच्या देण्यात आलेल्या नाहीत.
5 / 5
कारची किंमत 5.20 लाख रुपयांपासून सुरु होत असून टॉप मॉडेलची किंमत 7.38 लाख रुपये एकस् शोरुम आहे.
टॅग्स :Tataटाटाcarकार