Teaser of Kias first dedicated electric car EV6 released See First Look know details
Kia च्या पहिल्या डेडिकेटेड इलेक्ट्रिक कार EV6 चा टिझर जारी; पाहा फर्स्ट लूक By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 2:55 PM1 / 15दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Kia लवकरच आपली इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच करणार आहे. कंपनीनं आपल्या पहिल्या डेडिकेटेड इलेक्ट्रिक कार EV6 चा टीझर जारी केला आहे.2 / 15Kia EV6 मध्यं कंपनीनं नव्या ईव्ही प्लॅटफॉर्मचा (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) वापर केला आहे. या तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेली कंपनीची ही पिहिली इलेक्ट्रिक कार आहे. 3 / 15याव्यतिरिक्त EV6 कंपनीनीच्या नेक्ट जेन बीईव्हीच्या धर्तीवर डेव्हलप करण्यात आली आहे. 4 / 15Kia च्या म्हणण्यानुसार EV6 त्याचा ब्रँड लोगो ‘Movement That Inspires’ आणि डिझाईन फिलॉसॉफीप्रमाणे आहे.5 / 15कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये या कारचं वर्ल्ड प्रिमिअर केलं जाईल. 6 / 15कंपनीनं आपल्या EVs नाव ठेवण्यासाठी एका नव्या स्टॅटजीचा वापर केला आहे. यामध्ये ग्राहकांना Kia च्या इलेक्ट्रिक कार्सबाबात माहिती मिळणार आहे. 7 / 15तसंच कोणती कार पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे हेदेखील समजणार आहे. 8 / 15कंपनीनं आपल्या EV सीरिजच्या नावामागे एका नव्या पद्धतीचा वापर केला आहे. 9 / 15कंपनीच्या सर्व डेडिकेटेड BEV चं नाव EV नं सुरू होणार आहेत. यामध्ये ग्राहकांना एखादी कार पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे का याची माहिती मिळेल.10 / 15याशिवाय गाडीच्या नावात EV नंतर लाईनअपमध्ये कारच्या पोझिशननुसार नंबर दिला जाणआर आहे. 11 / 15जसं की EV6 चा अर्थ असा की ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक असून ही कंपनीच्या लाईनअपमध्ये असलेली सहावी कार आहे. 12 / 15Kia हा एक ग्लोबल मोबिलिटी ब्रँड आहे जो १९४४ मध्ये सुरू करण्यात आला होता. 13 / 15या समूहाचे जगभरात १९० मार्केट्स आणि ६ देशांमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत. सध्या या कंपनीत एकूण ५२ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.14 / 15कंपनी सद्यस्थितीत वर्षाला ३० लाख कार्सची विक्री करते. 15 / 15कंपनीचा ब्रँड लोगो ‘Movement that inspires’ असा आहे. या अर्थ असा की असं पाऊल उचला की ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications