Tesla to set up car manufacturing unit in Karnataka says chief minister Yediyurappa
Tesla कर्नाटकात उभारणार उत्पादन प्रकल्प; येडियुरप्पा यांची घोषणा By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 4:49 PM1 / 15जगातिल दिग्गज कार कंपनी टेस्ला ही आपला कार उत्पादन प्रकल्प कर्नाटकात उभारणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस. येडियुरप्पा यांनी अधिकृतरित्या यासंदर्भातील माहिती दिली.2 / 15एलन मस्क यांची कंपनी टेस्ला कर्नाटकात उत्पादन प्रकल्प उभारणार आहे, अशी माहिती येडियुरप्पा यांनी दिली. केंद्राच्या अर्थसंकल्पात राज्याला मिळणाऱ्या लाभाबद्दल माहिती देताना येडियुरप्पा यांनी याबद्दलही माहिती दिली. 3 / 15टेस्ला ही कंपनी कर्नाटकात इलेक्ट्रिक कार उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. राज्यातील तुमकुम जिल्ह्यात एक इंडस्ट्रियल कॉरिडोअर उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ७ हजार ७२५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि यामुळे तब्बल अडीच लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचं येडियुरप्पा म्हणाले. 4 / 15गेल्या महिन्यात टेस्लानं आपली सब्सिडायरी कंपनी टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं बंगळुरूमध्ये नोंदणी केली होती.5 / 15त्यानंतर येडियुरप्पा यांनी ट्वीट करत कंपनी बंगळुरूमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर उभारणार असल्याचं म्हटलं होतं. 6 / 15दिग्गज उद्योजक एलन मस्क यांच्या इलेक्ट्रीक कार आता भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे. 7 / 15इंजिनिअर्सच्या एका समुहाकडून २००३ मध्ये टस्ला या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. इलेक्ट्रिक गाड्या चालवताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ नये असा ही कंपनी स्थापन करण्यामागील त्यांचा उद्देश होता.8 / 15या कंपनीनं अवध्या काही काळातच म्हणजेच वर्षभरात इलेक्ट्रिक कार्स या अन्य कार्सप्रमाणेच वेगानं पळणाऱ्या आणि कम्फर्ट देणाऱ्या असल्याचं सिद्ध केलं.9 / 15२००८ मध्ये टेस्लानं रोडस्टर. एका अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानाचा आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा शुभारंभ केला.10 / 15टेस्लानंतर आपली पहिली प्रिमिअम ऑल इलेक्ट्रिक सेडान गाडी डिझाईन केली. ही कार टेस्लाची सर्वोत्तम कारही ठरली.11 / 15२०१० मध्ये टेस्लानं अमेरिकेत आपला आयपीओ लाँच केला. १९५६ मध्ये फोर्ड मोटर कंपनीच्या आयपीओनंतरची ही दुसरी अमेरिकन कंपनी ठरली.12 / 15२०१६ मध्ये टेस्लानं कमी किंमतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशा ३ गाड्या लाँच केल्या. आता टेस्ला ही कंपनी भारतातदेखील आपल्या ३ कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. यांची किंमत ५५ ते ६० लाखांच्या दरम्यान असेल.13 / 15टेस्लाच्या कार्सचं उत्पादन कॅलिफोर्निआ आणि शांघायमध्ये केलं जातं. कंपनी आता भारतासहित विकसनशील देशांमध्येही विस्तार करण्याच्या तयारीत आहे.14 / 15भारत आणि अन्य देशांकडे पाहते टेस्ला कमी किंमतीतही कार्स बाजारात आणण्य़ाच्या तयारीत आहे. याची किंमत १८.३ लाखांपर्यंत असू शकते.15 / 15१० जानेवारी २०२० रोजी बीएमडब्ल्यू, डॅमलर आणि फोक्सवॅगन यांना मागे टाकत टेस्ला अमेरिकेतील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी ठरली. आणखी वाचा Subscribe to Notifications