शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हाक मारताच स्टार्ट होणार! ह्युंदाईची नवी Creta फेसलिफ्ट लाँच; फिचर्स एवढी तर किंमत केवढी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 2:02 PM

1 / 9
एसयुव्हींमध्ये सर्वाधिक पसंतीची असलेली ह्युंदाई क्रेटा नव्या जमान्यातील नवे फिचर्स आणि नवा लूक घेऊन आली आहे. ह्युंदाईने क्रेटाचे फेसलिफ्ट लाँच केले आहे. एका आवाजावर ही नवी क्रेटा चालू, बंद करता येणार आहे. तसेच सेफ्टी फिचर्सची भरमार करून ह्युंदाईने थेट टाटाच्या नेक्सॉनला तगडी टक्कर दिली आहे.
2 / 9
CRETA SUV मध्ये कंपनीने एलईडी लाईट्सचा भरपूर वापर करून घेतला आहे. भारतीयांची आवड लक्षात ठेवून क्रेटाचा बाहेरील लुक बदलण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.
3 / 9
आतमध्ये कंपनीने 10.25-इंच कनेक्टेड स्क्रीन, डॅश आणइ एसी व्हेंटमध्ये बदल केले आहेत. 1.5 लीटर कप्पा टर्बो जीडीआई पेट्रोल, 1.5 लीटर एमपीआई पेट्रोल आणि 1.5 लीटर यू2 सीआरडीआय डीझेल इंजिन देण्यात आले आहे.
4 / 9
CRETA 6-स्पीड मॅन्युअल, IVT (इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन), 7-स्पीड DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह चार ट्रान्समिशन पर्यायांसह ऑफर केले आहे.
5 / 9
ह्युंदाईच्या ताफ्यातही आता एक फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगवाली कार आहे. यामुळे ह्युंदाईने क्रेटाच्या सेफ्टी फिचर्सवरही जोरदार काम केले आहे. क्रेटाचे बॉडी स्ट्रक्चर अधिक मजबूत केल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच यात ७० हून अधिक सेफ्टी फिचर्स देण्यात येत आहेत. यापैकी ३६ फिचर्स स्टँडर्ड आहेत. सहा एअरबॅग स्टँडर्ड दिल्या जाणार आहेत.
6 / 9
वरच्या व्हेरिअंटमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरामिक सनरूफ, 8-स्पीकर (BOSE), हवेशीर फ्रंट सीट्स, 8-वे ऑपरेटेड ड्रायव्हर सीट, लेव्हल-2 ADAS सूट आदी देण्यात येणार आहे.
7 / 9
लेव्हल-2 ADAS सूटमध्ये 19 सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान केली जात आहेत, ज्यात 360-डिग्री कॅमेरे, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, फ्रंट कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग, क्रूझ कंट्रोल, मागील क्रॉस-ट्राफिक टाळणे यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.
8 / 9
व्हॉईस कमांड वैशिष्ट्य देखील देण्यात येत आहे. 70 पेक्षा जास्त ब्लूलिंक कनेक्टेड कार फीचर्स, 148 एम्बेडेड व्हॉईस कमांड देण्यात आलेल्या आहेत. Alexa turn on my car, Alexa start my car असे इंग्रजी किंवा हिंदीत बोलून तुम्ही तुमची कार स्टार्ट करू शकता. यासाठी इंटरनेट देखील लागणार नाहीय.
9 / 9
Hyundai Creta 7 प्रकारांमध्ये आणि 6 मोनो-टोन रंग पर्यायांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. या कारची किंमत १०.९९ लाखांपासून सुरु होत आहे.