सेकंड हँड गाड्यांचे देशातील सर्वात स्वस्त मार्केट; BMW, Audi ही ४-५ लाखांत मिळतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:36 IST
1 / 8सेकंड हँड गाड्यांचे देशातील सर्वात स्वस्त मार्केट म्हणजे दिल्ली, त्याची दोन कारणेही आहेत. पहिले म्हणजे तिथे एक्सशोरुम किंमत कमी असते. म्हणजेच तेथील सरकारचा, आरटीओचा टॅक्सही कमी असतो. 2 / 8दुसरे महत्वाचे कारण म्हणजे तेथील प्रदूषण. म्हणजेच जास्त काळ जुनी कार तिथे चालविता येत नाही. डिझेलची किंवा पेट्रोलची कार १० वर्षे चालविण्याची परवानगी आहे. यामुळे तिथे महागड्या, अलिशान गाड्या अगदी चार लाख, पाच-सहा लाखांत विकायला आलेल्या असतात. 3 / 8अर्थात या गाड्या शेजारच्या पंजाब, हरियाणामध्ये चालू शकतात. यामुळे तेथील लोकांची चांदी झालेली आहे. या शेजारील राज्यातील लोकांना या बीएमडब्ल्यू, ऑडीसारख्या कार काही लाखांत मिळत आहेत. दिल्लीत अशा काही जागा आहेत, जिथे तुम्ही गेलात तर तुम्हालाही अशा प्रकारच्या डील मिळू शकतात. 4 / 8करोल बागचे तुम्ही नाव ऐकले असेल. अनेकदा रिल्समध्ये, सेकंड हँड कार किंवा कार मॉडिफिकेशनसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. इथे अशा अनेक डीलरकडे लक्झरी ब्रँडच्या कार विकायला आहेत. 5 / 8राजौरी गार्डन : जुन्या गाड्यांच्या बाजारासाठी हा परिसर देखील ओळखला जातो. इथे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार गाड्या मिळू शकतात.6 / 8दिल्ली कॅन्टोन्मेंट: हा भाग सेकंड हँड कारच्या चांगल्या डीलसाठी देखील ओळखला जातो. येथे कमी किंमतीतील कार उपलब्ध असतात. उदाहरण द्यायचे झाले तर महिंद्राची केयुव्ही १०० डिझेल कार महाराष्ट्रात ३.५-४ लाखांत मिळते तर तीच कार दिल्लीत तुम्ही १.८० ते २ लाखांत घेऊ शकता. 7 / 8वसंत कुंज: येथेही अनेक कार डीलर्स आहेत जे सेकंड हँड लक्झरी कार विकतात. यानंतर दिल्लीत नसले तरी गुरुग्राममध्येही दिल्लीच्या स्वस्त कार मिळतात. कारण ती कठोर नियमांमुळे दिल्लीच्या गाड्यांसाठी महत्वाची बाजारपेठ ठरली आहे. 8 / 8सेकंड हँड कार घेताना ती नीट तपासा, माहितगार मेकॅनिकला सोबत न्या. कारची सर्व्हिस हिस्ट्री चेक करा. महागड्या गाड्या या कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरलाच बहुतांशवेळा दुरुस्त केल्या जातात.