शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाईकचं मायलेज वाढविण्याची सर्वात सोपी पद्धत, आठवडाभरात दिसू लागेल रिझल्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 2:15 PM

1 / 6
बाईक मालकांच्या नेहमी मायलेजसंदर्भात तक्रारी येत असतात. त्यांची तक्रार आता दूर होणार आहे. कारण, आज आम्ही आपल्याला काही अशा टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून आपण आपल्या बाईकचे मायलेज सहजपणे वाढवू शकता. महत्वाचे म्हणजे, केवळ ऐका आठवड्यात आपल्याला याचा रिझल्ट दिसू लागेल.
2 / 6
बाईक सर्व्हिसिंग - इतर रुतूंच्या तुलनेत, उन्हाळ्यात मोटारसायकलला अधिक सर्व्हिसची आवश्यकता असते. अधिक उन्हामुळे मोटारसायकलच्या पार्ट्सला अधिक नुकसान होते. यामुळे वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक असलेली पार्टस देखील बदलायला हवेत.
3 / 6
टॉप स्पीडवर गाडी चालवणे टाळा - जर आपल्याला आपल्या बाईक कडून चांगले मायलेज मिळावे असे वाटत असेल, तर ती सेम स्पीडवर चालवा. यामुळे बाईकच्या इंजिनवर लोड येणार नाही. परिणामी पेट्रोल कमी खर्च होते. याशिवाय क्लच दबून गाडीचालवल्याने आणि वारंवार ब्रेकचा वापर केल्यानेही गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो...
4 / 6
ट्राफिक सिग्नलवर बंद करा इंजिन - आपण शहरात बाईक चालवत असताना अनेक वेळा सिग्नलला सामोरे जावे लागते. अशा वेळी जेव्हा लाल लाईट लागतो. तेव्हा आपल्या गाडीचे इंजिन बंद करा. याचा तुमच्या बाइकच्या मायलेजवर बराच फरक पडेल. आपल्याला चांगले मायलेज मिळेल.
5 / 6
बाईक लो RPM वर ठेवा - आपल्या बाईकचे RPM मिनिमम ठेवा. जर बाईकचा रेस अधिक असेल, तर हिला अधिक ईंधन लागेल. याशिवाय, ती स्टार्ट झाल्यानंतर उभी असली तरी मोठ्या अधिक इंधन घेईल. याशिवाय गाडी विनाकारण रेस करणेही टाळा.
6 / 6
गिअर शिफ्टिंग करताना घ्या अशी काळजी - गिअर शिफ्टिंग वेगाने केल्याने इंजिनवर दबाव येतो आणि दबाव अधिक वाढल्याने फ्यूअल कंझ्यूम वाढते. यामुळे बाईक चालवताना गिअर शिफ्टिंग स्लो करायला हवे.
टॅग्स :AutomobileवाहनbikeबाईकTrafficवाहतूक कोंडी