शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Okinawa Okhi 90 इलेक्ट्रीक स्कूटरची लाँच डिटेल आली समोर; पाहा काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 1:54 PM

1 / 9
Okinawa Okhi 90 Electric Scooter : ओकिनावा (Okinawa) देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रीक दुचाकी ब्रँडपैकी एक आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्लो-स्पीड आणि हाय-स्पीड इलेक्ट्रीक स्कूटर्सचा समावेश आहे.
2 / 9
कंपनी आता आपल्या लाइनअपमध्ये आणखी एक नवीन स्कूटर जोडण्याची तयारी करत आहे. कंपनी पुढील महिन्यात Okhi 90 इलेक्ट्रीक स्कूटर (Okhi 90 e-scooter) भारतात लाँच करणार आहे.
3 / 9
परंतु कंपनी आपल्या Ockhi 90 ई-स्कूटरच्या किंमतीची माहिती 24 मार्च 2022 रोजी देणार आहे. Ockhi 90 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये LED हेडलॅम्प, क्रोम रीअरव्ह्यू मिरर, चंकी ग्रॅब रेल, अलॉय व्हील आणि LED टेल लाइट्ससह स्टेप-अप पिलियन सीट देखील असतील, अशी माहिती स्पाय इमेजवरून समोर आली आहे.
4 / 9
याशिवाय या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हेईकल अलर्ट, जिओ-फेन्सिंग, ई-कॉल, डायग्नोस्टिक्स, राइड बिहेव्हिअर अॅनालिसिस आणि अन्य अनेक फीचर्स असण्याची शक्यता आहे.
5 / 9
रिपोर्ट्सनुसार Ockhi 90 एक रिमुव्हेबल लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येईल. या स्कूटरचा टॉप स्पीड सुमारे 80 किमी/तास असेल आणि राइडिंग रेंज सुमारे 150 किमी असेल. लाँचनंतर या स्कूटरची स्पर्धा बजाज चेतक, TVS iQube, Ola S1, Simple One यांच्याशी असेल.
6 / 9
भारतात इलेक्ट्रीक स्कूटरबाबत सध्या बाजार गरम आहे. देशात सध्या हिरो इलेक्ट्रीकच्या स्कूटर जोरात विकल्या जात आहेत. परंतु दोन नंबरला एक अशी कंपनी आहे, जिचे नाव वाटते जपानी परंतु ती आहे मात्र भारतीय. या कंपनीच्या स्कूटरला देखील मोठी मागणी आहे. कारण या कंपनीच्या स्कूटर स्वस्तही आहेत आणि चांगली रेंजही देतात.
7 / 9
ही सध्याच्या घडीला देशातील दोन नंबरची ईलेक्ट्रीक स्कूटर कंपनी आहे. ओकिनावाकडे सध्या Okinawa Dual, Okinawa PraisePro, Okinawa R30, Okinawa Ridge आणि Okinawa Lite सारख्या स्कूटर आहेत. चांगला लूक आणि सोबत चांगले फिचर्सही या स्कूटरमध्ये मिळतात. बॅटरीची रेंजही चांगली आहे.
8 / 9
Okinawa PraisePro ची किंमत 79,845 रुपये आहे. सर्वाधिक वेग 58 kmph आणि सिंगल चार्जवर बॅटरीची रेंज 88 किलोमीटर आहे. Okinawa iPraise+ ची किंमत 1.05 लाख रुपये आहे. रेंज 139 किलोमीटर असून 58 kmph वेग आहे. यानंतर Okinawa Dual इलेक्ट्रीक स्कूटर येते. याची किंमत 61,998 ते 82,995 रुपये आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 25 kmph आणि सिंगल चार्जवर बॅटरी रेंज 130 किलोमीटर आहे.
9 / 9
Okinawa R30 ची किंमत 61,998 रुपये आहे. बॅटरी रेंज 60 km आहे. टॉप स्पीड 25 kmph आहे. Okinawa Ridge ची किंमत 64,797 रुपये आहे. या स्कूटरची रेंज 84 km पर्यंत आहे. तर सर्वाधिक वेग हा 45 kmph आहे. Okinawa Lite ची किंमत 66,993 रुपये आहे. या स्कूटरची रेंज 60 km आणि टॉप स्पीड 25 kmph आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड