शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन जप्त होऊ शकते; हे नियम तोडणे टाळाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 1:15 PM

1 / 10
देशातील मोटार व्हेईकल कायद्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतो. यामध्ये जुने कालबाह्य झालेले नियम रद्द करून नवीन नियम आणले जातात. असेच काही नवीन नियम आहेत, ज्याद्वारे तुम्ही नियम मोडल्यास तुमचे लायसन जप्त होऊ शकते.
2 / 10
आता जवळपास सर्वच कारमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी देण्यात येते. ड्रायव्हिंग करताना ब्लूटूथच्या माध्यमातून फोनवर बोलणे बेकायदेशीर आहे. असे आढळल्यास दंड किंवा लायसन जप्त केले जाऊ शकते.
3 / 10
मोबाईल वापरावर नवीन नियम लागू झाला आहे. वाहन चालविताना नेव्हिगेशनसाठीच मोबाईल वापरता येणार आहे. अन्य कारणासाठी मोबाईल वापरताना आढळल्यास कारवाई होऊ शकते.
4 / 10
शाळांच्या आजुबाजुच्या रस्त्यांवर वेगाने वाहन चालविण्यास परवानगी नाही. अशआ ठिकाणी स्पीड लिमिटचे बोर्ड लावलेले असतात. जरी बोर्ड लावलेला नसेल तर त्या ठिकाणच्या रस्त्यांवर 25 किमी पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवू नये. असे न केल्यास लायसन जप्त होऊ शकते.
5 / 10
कारमध्ये आता जेबीएलसारख्या कंपन्यांची म्युझिक सिस्टिम देण्यात येत आहे. यामुळे गाणी ऐकण्याचा आनंद द्विगुणित होत आहे. मात्र, कारमध्ये किती जोरात गाणी लावावीत यावर स्पष्टता नसल्याने वाहतूक पोलीस चलान फाडू शकतात. यासाठी 100 रुपयांपासून दंड सुरु होतो. जर मोठा आवाज असल्याचे वाटल्यास लायसनही जप्त होऊ शकते.
6 / 10
सार्वजनिक रोडवर रेसिंग करण्यासही बंदी आहे. यावर दंड किंवा लायसन जप्त केले जाऊ शकते.
7 / 10
मोठ्या आवाजात हॉर्न वाजविण्यामुळेही लायसन रद्द होऊ शकते. बहुतांश गाड्यांना खरेदी करतेवेळी आरटीओने परवानगी दिलेले हॉर्न असतात. मात्र, अनेकजण हे हॉर्न बदलतात. तसेच अन्य मॉडिफिकेशनही करण्याची परवानगी नाही.
8 / 10
सर्रास दुचाकीस्वार वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी फुटपाथवरून जातात. वाहतूक नियमांनुसार हा गुन्हा आहे. असे केल्यास लायसन जप्त केले जाऊ शकते.
9 / 10
पादचाऱ्यांना रस्ता पार करता यावा यासाठी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग आखलेले असते. लाल सिग्नल लागलेला असताना जर त्यावर वाहन उभे केल्यास दंड लागू शकतो. तसेच काही महिन्यांसाठी तुमचे लायसन सस्पेंड केले जाऊ शकते.
10 / 10
अँबुलन्सला रस्ता न देणे देखील भारी पडू शकते. अँम्बुलन्समधून गंभीर रुग्णांना नेण्यात येते. हे रुग्ण वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचावेत यासाठी रस्ता देणे बंधनकारक आहे. असे न केल्यास तुमचे लायसन जप्त होऊ शकते. तसेच दंडही होऊ शकतो.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षाcarकार