शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिंगल चार्जमध्ये 85kms रेंज; किंमत ५० हजारांपेक्षाही कमी, पाहा कोणत्या आहेत या Electric Scooters

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 5:57 PM

1 / 8
भारतात इलेक्ट्रीक वाहनांची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच आता अनेक कंपन्या इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक आणि कार बनवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. या इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सबसिडीही (Government Subsidy) देत ​​आहे.
2 / 8
जर तुम्हीही इलेक्ट्रीक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला अशा काही इलेक्ट्रीक स्कूटर्सबद्दल आम्ही माहिती देत आहोत ज्यांची किंमत 45,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि सिंगल चार्जवर चांगली रेंजही देतात. यासोबतच यामध्ये अनेक नवीन फीचर्सही देण्यात आले आहेत.
3 / 8
कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 85 किमीची रेंज देते. त्याच्या बॅटरी क्षमतेबद्दल सांगायचे झाल्यास, ती 60V/20-30Ah सह येते. ही स्कूटर 6 ते 8 तासांत पूर्णपणे चार्ज होते. यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तसेच यासोबत ट्यूबलेस टायरचा पर्यायही आहे.
4 / 8
या स्कूटरचे अनेक फीचर्स डिजिटल पद्धतीनं जोडण्यात आले आहेत. Komaki XGT KM स्कूटर केवळ एका स्टँडर्ड व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरची किंमत 42,500 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे.
5 / 8
ही इलेक्ट्रीक स्कूटर तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. याच्या रेंजबद्दल सांगायचं झालं तर सिंगल चार्जवर ती 84km धावते. या स्कूटरच्या तीन निरनिराळ्या व्हेरिअंटमध्ये निरनिराळी रेंज मिळते. Ampere Magnus ची किंमत 49,999 रुपयांपासून सुरू होते जी 76,800 रुपयांपर्यंत आहे.
6 / 8
Magnus Pro हे टॉप व्हेरिएंट आहे. याची किंमत 76,800 पर्यंत आहे. या स्कूटरमध्ये बॅटरी 60V, 28Ah सह येते. यामध्ये तीन वर्षांची बॅटरी वॉरंटी देण्यात आली आहे. या स्कूटरची मोटर पॉवर 1200W आहे.
7 / 8
हीरोच्या अनेक स्कूटर्स तुमच्या बजेटमध्ये येतील. परंतु ही हीरो इलेक्ट्रीक फ्लॅशची किंमत 46600 रूपयांपासून सुरू होते आणि ती 56940 रूपयांपर्यंत जाते. हीरो इलेक्ट्रीक फ्लॅश ही स्कूटर दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
8 / 8
सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 85 किमी पर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यााची बॅटरी क्षमता 51.2 V, 30 Ah इतकी आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा 25 किमी प्रति तास आहे. याशिवाय ही स्कूटर 4 ते 5 तासांमध्ये पूर्ण चार्ज होतं. याची मोटर पॉवर 250W सोबत येते.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड