these mistakes during driving can lose your driving licence
'या' चुका कराल तर ड्रायव्हिंग लायसन्स होईल जप्त By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 4:02 PM1 / 8वाहन चालवताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. काही जण वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. मात्र अशा काही चुका या महागात पडू शकतात. ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतं. 2 / 8गाडीमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक लावल्यास दंड होऊ शकतो. आवाजाचा त्रास इतर वाहन चालकांना झाल्यास लायसन्स जप्त होऊ शकतं. 3 / 8रस्त्यावर अनेकजण वेगाने गाड्या चालवतात. यामुळे अपघातही होतात. काही ठिकाणी स्पीड लिमिटचा बोर्डही लावण्यात आलेला आहे. वेग मर्यादा ओलांडल्यास लायसन्स जप्त होऊ शकतं. 4 / 8गाडी चालवताना फोनचा वापर केल्यास दंड भरावा लागतो. कायद्यानुसार चालक नेव्हिगेशन सर्व्हिसशिवाय इतर कोणत्याही कामासाठी मोबाईलचा वापर करू शकत नाही. 5 / 8अनेकजण कार चालवताना ब्लूट्थच्या माध्यमातून संवाद साधत असतात. मात्र असं केल्यास दंडासोबतच ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त होऊ शकतं. 6 / 8ट्रॅफिक असल्यास अनेकजण फुटपाथवर गाडी चालवतात. मात्र असं केल्यास वाहतुकीच्या नियमांचा भंग आहे. फुटपाथवर गाडी चालवल्यास लायसन्स जप्त होऊ शकतं. 7 / 8सार्वजनिक रस्त्यावर रेस चालवल्यास ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतं. 8 / 8रुग्णवाहिकेतून प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना नेण्यात येते. त्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications