शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवीन कार घेण्याचा विचार करताय? मग, या महिन्यात मार्केटमध्ये लाँच होणार 5 कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 2:02 PM

1 / 6
नवी दिल्ली : तुम्ही सणासुदीच्या काळात कार घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कार खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती कोणती कार चांगली आहे, कोणाचे फीचर्स आणि मायलेज चांगले असू शकते, याबद्दल खूप सर्च करताना दिसतात. दरम्यान, या महिन्यात कोणत्या कार मार्केटमध्ये दाखल होणार आहेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
2 / 6
रिपोर्ट्सनुसार, निसान या महिन्यात आपल्या सब-फोर मीटर एसयूव्ही मॅग्नाइटचा AAMT व्हेरिएंट लाँच करू शकते. सध्या ही एसयूव्ही सीव्हीटी ट्रान्समिशनसह बाजारात विकली जाते. नवीन ट्रान्समिशन व्यतिरिक्त या एसयूव्हीमध्ये तुम्ही इतरही अनेक बदल पाहू शकता. ज्यामध्ये इंटीरियर आणि काही फीचर्समध्ये देखील बदल दिसतील. कंपनी या एसयूव्हीची नवीन एडिशन कुरो देखील या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लाँच करू शकते. सध्या कारच्या नवीन एडिशनचे बुकिंग सुरू झाले आहे.
3 / 6
टाटा कंपनी या महिन्यात एसयूव्ही पंचचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात आणू शकते. निर्मात्याच्या मते, या वर्षाच्या अखेरीस तीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केल्या जाऊ शकतात. कंपनीने सप्टेंबर महिन्यात आपली Nexon EV फेसलिफ्ट लाँच करून याची सुरुवात केली आहे. लाँचपूर्वी, ईव्हीची रस्त्यांवर चाचणी होताना दिसली आहे.
4 / 6
लक्झरी कार निर्माता कंपनी लेक्सस या महिन्यात आपली एलएम एमपीव्ही लाँच करू शकते. ही एमपीव्ही टोयोटा वेलफायर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यापासूनच या कारसाठी बुकिंग सुरू केले होते.
5 / 6
कंपनी या महिन्यात फाईव्ह डोअर व्हर्जन लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार, ही एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी टेस्टिंग दरम्यान अनेक दिसून आली होती. आगामी कारमध्ये तीन रो सीट्स दिसण्याची शक्यता आहे.
6 / 6
ही इलेक्ट्रिक कार थायलंडमध्ये 30 ते 37 लाख रुपये किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही कार लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. जर ही कार भारतात आली तर तिची संभाव्य किंमत 60 लाख रुपये असू शकते. सध्या कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार