शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Small Family Car : कार घेण्याचा विचार करताय? छोट्या फॅमिलीसाठी भारी आहेत या कार्स, मायलेजही जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 12:37 PM

1 / 12
आपण नवीन कार खरेदी करताना, लूक आणि परफॉर्मन्ससह ती किती मायलेज देते याकडे बरेच लक्ष दितो. सध्या देशात अशा अनेक कार्स आहेत ज्या चांगल्या मायलेजसाठी ओळखली जातात.
2 / 12
मारुती सुझुकी ते टाटा, ह्युंदाई यां सारख्या ब्रँडच्या वाहनांचा केवळ परफॉर्मन्सच नाही, तर मायलेजच्या बाबतीतही या कार्स एकमेकांना चांगली टक्कर देतात. दरम्यान, जर तुमचं छोटं कुटुंब असेल आणि तुम्ही अधिक मायलेज देणारी कार शोधत असाल तर या ठरू शकतील तुमच्यासाठी सर्वात बेस्ट कार्स.
3 / 12
मायलेजच्या बाबतीत यादीत सर्वात वर असलेली कार म्हणजे हॅचबॅक सेलेरिओ. यामध्ये ड्युअलजेट K10, 3-सिलिंडर 1.0L पेट्रोल + CNG इंजिन देण्यात आलं आहे. ते 56 बीएचपीची पॉवर आणि 82 एनएमचा टार्क जनरेट करते. यह सीएनजी पर ही कार 35.60 km/kg चं मायलेज देते.
4 / 12
याशिवाय पेट्रोलवरही ही कार उत्तम मायलेज देते. पेट्रोलवर सेलेरिओ 26.68 kmpl चं मायलेज देते. सेलेरिओच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत 6.68 लाख रूपयांपासून सुरू होते. 
5 / 12
या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणजे मारूतीची वॅगन आर. या कारचं सीएनजी व्हेरिअंट 34.05 km/kg चं मायलेज देतं.
6 / 12
तर दुसरीकडे या कारचं पेट्रोल व्हेरिअंट 25.18 किमी प्रति लिटरचं मायलेज देतं. वॅगन आरच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत 6.42 लाख रूपयांपासून सुरू होते.
7 / 12
मारूती सुझुकीची डिझायर ही कार देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. मायलेजच्या बाबतीत सांगायचं झआलं तर या कारचं सीएनजी व्हेरिअंट 31.12 किमी/किलोचं मायलेज देते.
8 / 12
मारूती सुझुकीची डिझायर ही कार देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. मायलेजच्या बाबतीत सांगायचं झआलं तर या कारचं सीएनजी व्हेरिअंट 31.12 किमी/किलोचं मायलेज देते.
9 / 12
मारूती सुझुकी ऑल्टो हे सर्वात लहान आणि स्वस्त कार आहे. या कारचं सीएनजी व्हेरिअंट 31.59 किमी/किलोचं मायलेज देते. तसंच पेट्रोल व्हेरिअंट 22 किमीचं मायलेज देते.
10 / 12
यामध्ये 0.8 लिटरटं इंजिन देण्यात आलं असून ते 40 बीएचपीची पॉवर आणि 60 एनएमचं टॉर्क जनरेट करते. ऑल्टोच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत 5.02 लाख रूपयांपासून सुरू होते.
11 / 12
या लिस्टमध्ये अखेरची कार म्हणजे ह्युंदाईची ग्रँड आय 10 निओस. या कारच्या सीएनजी व्हेरिअंटमध्ये 28 किमी प्रति किलोचं मायलेज मिळतं. तर पेट्रोल व्हेरिअंट 21 किमी प्रति लिटरचं मायलेज देतं.
12 / 12
यात मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1197 सीसीचं इंजिन देण्यात आलं आहे. ते 68 बीएचपीची पॉवर आणि 95.2 एनएमचा टॉर्क जनरेट करते. याच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत 7.16 लाख रूपयांपासून सुरू होते.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीHyundaiह्युंदाईcarकार