शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 4:55 PM

1 / 8
जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनी मर्सिडिज बेंझने आपली ऑल न्यू थर्ड जनरेशनची CLS 4-डोअर कुपे कार भारतात आज लाँच केली.
2 / 8
सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 84.7 लाख रुपये असून ही कार ऑडी A7 आणि ऑडी A7 ग्रान कुपे यांना कडवी टक्कर देणार आहे.
3 / 8
मर्सिडिज बेंझ CLS मध्ये कंपनीने नवीन लूक दिलेला असला तरीही तिच्यामध्ये मर्सिडिजच्या कारचे रुप दिसते. नवीन ग्रील डिझाईनसोबत आकर्षक हेडलँप देण्यात आले आहेत.
4 / 8
मागील बाजुला मर्सिडीज-बेंज कूपे टेल लँप क्लस्टरसोबत हॉरिझंटल टेल लँप्स आणि छोटे स्टबी बूट देण्यात आले आहे. याशिवाय कारमध्ये 5 स्पोक 15 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
5 / 8
सीएलएसच्या इंटेरिअरमध्ये आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे. याशिवाय डॅश बोर्डवर वुडन एडॉर्न्ससोबत चार जेट टर्बाइन प्रेरित एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत.
6 / 8
दोन मोठ्या स्क्रीन एक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि दुसरी डिजिटल डॅशबोर्डसाठी देण्यात आली आहे. नवीन सीएलएस 5 सीटर कार आहे.
7 / 8
सीएलएसच्या CLS300d मॉडेलमध्ये BS-VI मानांकनाचे 2.0 लीटर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 242bhp ताकद निर्माण करते.
8 / 8
CLS 9-स्पीड ड्युअल क्लच अॅटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यासाठी 6.2 सेकंद लागतात. सर्वाधिक वेग 250 किमी प्रती तास आहे.
टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झcarकार