शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Royal Enfield च्या 'या' बाईकनं बिघडवला आपल्याच Classic 350 चा खेळ, गेल्या महिन्यात तुफान विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 3:10 PM

1 / 6
वाहन नवीन आणि चांगले असेल तर लोक ते खरेदी करताना फारसा विचार करत नाहीत. हे चारचाकी तसेच दुचाकी दोन्ही वाहनांना लागू होते. अशा प्रकारे, मारुतीच्या नवीन ब्रेझाने आपल्या सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाईच्या व्हेन्यूला मागेही टाकलंय. परंतु हे केवळ चारचाकी वाहनांनाच लागू होत नाही तर दुचाकी वाहनांनाही लागू होतं.
2 / 6
रॉयल एनफिल्डच्या नव्या हंटर 350 ने स्वतःच्या क्लासिक 350 चा खेळ बिघडवला आहे. ऑगस्टमध्ये रॉयल एनफिल्ड हंटरच्या 18,197 युनिट्सची विक्री झाली. तर क्लासिक 350 च्या 18,993 युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच दोघांच्या विक्रीत फक्त 796 युनिट्सचा फरक होता. या आकड्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकांना रॉयल एनफिल्डची नवी हंटर पसंतीस पडत आहे.
3 / 6
रॉयल एनफिल्डची नवीन हंटर तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. रेट्रो फॅक्टरीची एक्स-शोरूम किंमत 1,49,900 रुपये, मेट्रो डॅपरची किंमत 1,63,900 रुपये आणि मेट्रो रिबेलची एक्स-शोरूम किंमत 1,68,900 रुपये आहे.
4 / 6
नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 बाईकमध्ये 349cc, सिंगल-सिलिंडर, 4-स्ट्रोक एअर-ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आलेय. हे इंजिन फ्युअल इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले हे इंजिन 6100rpm वर 20.2bhp पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm कमाल टॉर्क जनरेट करते. हंटर 350 चा टॉप स्पीड 114kmph आहे.
5 / 6
हंटर 350 ही भारतातील सर्वात छोटी रॉयल एनफिल्ड मोटरसायकल आहे. याचा हीलबेस 1370mm आहे, जो Meteor आणि Classic 350 पेक्षा लहान आहे. बाईकमध्ये 25 डिग्री शार्प रेक अँगल आहे. यात 13-लिटरची इंधन टाकी आहे. हंटर 350 चे सर्व व्हेरिअंट ड्युअल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) सह येतात.
6 / 6
Royal Enfield ची नवीन 350cc बाईक Rebel Red, Rebel Blue, Rebel Black, Dapper Grey, Dapper Ash आणि Dapper White या 6 पेंट स्कीममध्ये लाँच करण्यात आली आहे. नवीन RE हंटर 350 रेट्रो-स्टाईलच्या डिझाइनसह येते. ज्यामध्ये साउंड हेडलॅम्प, सर्क्युलर टर्न इंडिकेटर, IRVM आणि टेललाइट्स आहेत. यात टीयरड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी आहे ज्यावर रॉयल एनफिल्ड बॅज पाहायला मिळतो.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक