शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहे देशातील सर्वाधिक मायलेज देणारी SUV, 1 लिटर पेट्रोल-डिझेलमध्ये कापते 28KM अंतर; हे पर्यायही पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 7:09 PM

1 / 6
इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे भारतीय ग्राहक सीएनजी, हायब्रीड तसेच इलेक्ट्रिक वाहनांसारख्या अधिक परवडणाऱ्या आणि पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. यामुळे, आज आम्ही आपल्याला भारतातील सर्वाधिक फ्यूअल एफिशिएंट एसयूव्हीसंदर्भात माहिती देत आहोत. ही एसयूव्ही सध्या भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे हिच्या मायलेजचे आकडे आधिकृत (ARAI प्रमाणित) आहेत, जे ड्रायव्हिंगची स्थिती आणि प्रदेशानुसार, वेगवेगळेही असू शकतात.
2 / 6
MARUTI GRAND VITARA (मायलेज- 28KMPL) - नुकत्याच लॉन्च झालेल्या मारुती सुझुकी ग्रँड विटाराचे 1.5L अॅटकिन्सन सायकल TNGA पेट्रोल पॉवरट्रेन (स्ट्रॉन्ग हायब्रिड) व्हेरिअंट 27.97kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. ही एसयूव्ही e-CVT गिअरबॉक्ससह 115bhp पॉवर जनरेट करू शकते. हिची (Strong Hybrid eCVT) किंमत 17.99 लाख रुपये ते 19.49 लाख रुपयांपर्यंत दरम्यान आहे.
3 / 6
TOYOTA URBAN CRUISER HYRYDER (मायलेज- 28KMPL) टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर आणि मारुती ग्रँड विटाराचे फीचर्स आणि पॉवरट्रेन सारखेच आहे. मात्र, डिझाइनच्या बाबतीत दोन्ही कार अत्यंत वेगळ्या आहेत. हिचे स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिअंट 27.97kmpl पर्यंतचे मायलेज देऊ शकते. स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिअंट्सची किंमत 15.11 लाख रुपये ते 18.99 लाख रुपयांदरम्यान आहे.
4 / 6
KIA SONET (मायलेज - 24.1KMPL) - भारतात किआ सोनेट हीदेखील एक सर्वाधिक फ्यूअल एफिशिएंट एसयूव्हींपैकी एक आहे. हिचे 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन असलेले व्हेरिअंट 24.1kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. हिच्या डिझेल व्हेरिअंट्सची किंमत 9.05 लाख रुपये ते 12.99 लाख रुपयांदरम्यान आहे.
5 / 6
HYUNDAI VENUE (मायलेज- 23.4KMPL) किआ सॉनेटप्रमाणेच ह्युंदाई व्हेन्यूचे डिझेल मॅनुअल व्हेरिअंट देखील चांगले मायलेज देते. हे व्हेरिअंट 23.4KMPL एवढे मायलेज ऑफर करते. हिच्या डिझेल व्हेरिअंट्सची किंमत 10.00 लाख रुपये ते 12.52 लाख रुपयांपर्यंत जाते.
6 / 6
TATA NEXON (मायलेज - 21.5KMPL) - टाटाची सर्वाधिक विकली जाणारी नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर पेट्रोल अथवा 1.5 लिटर डिझेल इंजिन मिळते. हिचे डिझेल व्हेरिअंट 21.5kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. हिची किंमत 11.15 लाख रुपये ते 14.08 लाख रुपयां दरम्यान आहे. या हिच्या डिझेल व्हेरिअंट्सच्या किंमती आहेत.
टॅग्स :MarutiमारुतीHyundaiह्युंदाईToyotaटोयोटाTataटाटाcarकार