शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मारूती, टाटाच्या कारला टक्कर द्यायला येते ही लक्झरी CNG कार, मायलेजही जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 5:54 PM

1 / 8
टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (Toyota Kirloskar Motors) लवकरच Glanza चे CNG मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. तथापि, लॉन्च होण्याआधीच त्याची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स संबंधित तपशील लिक झाले आहेत. लिक झालेल्या माहितीनुसार, Glanza CNG तीन व्हेरिअंट S, G आणि V मध्ये येईल.
2 / 8
सर्वच व्हेरिअंटमध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किट देण्यात येईल. या कारमध्ये 1.2-लिटर, 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात येईल जे 6,000 rpm वर 76bhp पॉवर जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. Glanza पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.48 लाख ते 9.51 लाख रुपये आहे.
3 / 8
Toyota Glanza CNG ला 1.2-लिटर आणि चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळतील. जे पेट्रोल मोडमध्ये 6,000 वर 88bhp ची पॉवर जनरेट करेल. त्याच वेळी, सीएनजी मोडमध्ये, ते 6,000 rpm वर 76bhp पॉवर जनरेट करेल. ही मोटर केवळ पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत येईल.
4 / 8
कारचं CNG व्हेरिअंट 25 किमी/किलोपर्यंत मायलेज मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यातआला आहे आहे. पेट्रोलवरील त्याच्या AMT प्रकाराची फ्युअल एफिशिअन्सी 22.94 kmpl असेल. म्हणजेच सीएनजीचे मायलेज 2 किमी अधिक असेल.
5 / 8
Toyota Glanza मध्ये 1.2-लिटर आणि चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळतील. जे पेट्रोल मोडमध्ये 6,000 वर 88bhp ची पॉवर जनरेट करेल. त्याच वेळी, सीएनजी मोडमध्ये, ते 6,000 rpm वर 76bhp पॉवर जनरेट करेल. ही मोटर केवळ पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडली जाईल.
6 / 8
याच्या CNG इंजिनला 25 किमी/किलोपर्यंत मायलेज मिळेल, असा विश्वास आहे. पेट्रोलवरील त्याच्या AMT व्हेरिअंटमध्ये फ्लुअल एफिशिअन्सी 22.94 kmpl असेल. म्हणजेच सीएनजीचे मायलेज 2 किमी अधिक असेल.
7 / 8
Toyota Glanza CNG मध्ये ओव्हर-द-एअर (OTA) ऑडिओ अपडेट, Arkamys ऑडिओ सिस्टम, 360 डिग्रीसह 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखे फीचर्स मिळतील. कारला पार्किंग कॅमेरा, ऑटो फोल्ड विंग मिरर, ऑटो डिमिंग इंटिरियर रिअर व्ह्यू मिरर, लेदर रॅपिड स्टिअरिंग, क्रूझ कंट्रोल, यूव्ही प्रोडक्ट ग्लास, एलईडी डीआरएल आणि एलईडी फॉग लॅम्प देखील मिळतात.
8 / 8
टोयोटा ग्लान्झा सीएनजीच्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच त्याची लांबी, रुंदी आणि उंची सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत सारखीच असेल. Glanza CNG ची लांबी 3990mm, रुंदी 1745mm आणि उंची 1500mm आहे. त्याचा व्हीलबेस 2520mm आहे. Glanza CNG च्या S, G आणि V या तिन्ही प्रकारांचे वजन 1450 किलो असेल.
टॅग्स :ToyotaटोयोटाMaruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटाHyundaiह्युंदाई