three best options in CNG segment, get powerful mileage at affordable price
दमदार मायलेज आणि परवडणारी किंमत, लो बजेटमध्ये खरेदी करा 'या' CNG कार By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 3:24 PM1 / 8 पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सीएनजी वाहनांचा सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. अलीकडेच या सेगमेंटमध्ये 3 मोठे लॉन्च झाले आहेत, ज्यात मारुती सुझुकी Celerio CNG, Tata Tiago CNG आणि Tata Tigor CNG यांचा समावेश आहे. 2 / 8 या तिन्ही गाड्यांची सुरुवातीची किंमत 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. आज आम्ही तुम्हाला तिन्ही सीएनजी कार्सचे वैशिष्ट्ये सांगणार आहोत. यातून तुम्ही तुमच्या आवडीची आणि बजेटमध्ये बसणारी सीएनजी कार निवडू शकता.3 / 8 Hyundai Santro CNG- Hyundai च्या Santro मध्ये तुम्हाला CNG चा पर्याय मिळतो. ही गाडी तुम्हाला 30.48 KM प्रति किलो मायलेज देते. या गाडीच्या बेस व्हेरिएंटची किंमत 4 लाख 28 हजार रुपये आहे आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 6 लाख 38 हजार रुपये आहे. 4 / 8 कंपनीने या कारमध्ये 1.1 लीटर इंजिन देण्यात आले आहे, जे CNG सह 60hp आणि 85.3Nm टॉर्क जनरेट करते. ही कार Magna आणि Sportz या दोन प्रकारांमध्ये येते. त्याची किंमत 6.09 लाख ते 6.38 लाख रुपये आहे.5 / 8 Tata Tiago CNG- टाटाची Tiago पेट्रोल प्रकारांप्रमाणेच, XE, XM, XT, XZ+ आणि XZ+ ड्युअल-टोन अशा सर्व इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Tiago मध्ये मोठे आणि अधिक शक्तिशाली इंजिन मिळते. हे 1.2 लीटर रेवोट्रॉन मोटरला आपल्या ट्रोल पॅरेललप्रमाणे सपोर्ट करतो. पण, 72 hp आणि 95nmचा टॉर्कही जनरेट करतो.6 / 8 या गाडीची मोटर 5-स्पीड MT सह येते. कंपनीचा दावा आहे की ही गाडी 26.49 किमी/किलो मायलेज देते. Tiago CNG ची किंमत 6.09 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.7 / 8 Maruti Suzuki Celerio CNG - मारुती सुझुकीने नुकतीच आपली नवीन CNG Celerio लॉन्च केली आहे. यात 1.0 लीटर k10c ड्युअल जेट इंजिन आहे. सेलेरियो ही सर्वाधिक मायलेज देणारी पेट्रोल कार आहे, तर सीएनजीमध्येही ती या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.8 / 8 CNG मॉडेल 57hp आणि 82.1Nm टॉर्क जनरेट करते. मारुती सेलेरियो सीएनजी फक्त व्हीएक्सआय मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 6.58 लाख रुपये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications