शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टोल नाक्यावर १०० मीटरपेक्षा मोठी रांग, १० सेकंड वेटिंगचा खरोखरच नियम होता? NHAI कडे लाखो तक्रारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 1:48 PM

1 / 8
Toll NHAI 10 Second Rule: भारतात आता जीएनएसद्वारे टोल आकारला जाऊ लागला आहे. अद्याप काही टोल नाक्यांवरच ही सिस्टीम असल्याने त्याचा लाभ अन्य ठिकाणी होत नाहीय. अशातच टोल नाक्यावरील १०० मीटरवरील पिवळ्या रेषेचा नियम एनएचएआयने रद्द केला आहे. आधीच हा नियम आहे की नाही याचीच कोणाला शाश्वती नसायची. कारण कोणत्याही टोलनाक्यावर तो पाळला जात नसायचा. परंतू, हा नियम होता आणि त्यासाठी काही अटी देखील होत्या.
2 / 8
१०० मीटरपेक्षा मोठी रांग किंवा टोल गेटवर १० सेकंडपेक्षा वेटिंग टाईम लागला तर त्यापुढच्या वाहनांना फुकटात टोल क्रॉस करता यायचा. हा नियम प्रत्यक्षात होता. एनएचएआयने २०२१ मध्ये एका नोटिफिकेशन जारी करून हा नियम लागू केला होता. परंतू, या नियमातील अटी शर्थी कधीच बाहेर आल्या नाहीत. केवळ १०० मीटर रांग आणि १० सेकंड एवढेच सांगितले जायचे.
3 / 8
एनएचएआयने हा नियम २०२१ पासून नव्या डिझाईनचे टोल बनविण्यात आलेल्याच टोलवर लागू केला होता. म्हणजेच त्यापूर्वी बनलेल्या टोलवर हा नियम लागू नव्हता. ज्या प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा टोल प्लाझासाठी जमीन अधिग्रहन करणे बाकी होते अशा ठिकाणीच हा नियम लागू होत होता.
4 / 8
आता या नियमावर गेल्याच महिन्यात एक नवीन अपडेट आली आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार आता हा नियम पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. आता कोणत्याही टोलवर कितीही रांग लागूद्या, कोणालाही फुकट सोडले जाणार नाही.
5 / 8
या नियमावरून लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते, यामुळे टोलवर वादही होत होते. यामुळे एनएचएआयने टोल मॅनेजमेंट गाईडलाईन्समधून हा नियमच काढून टाकला आहे. या नियमावरून एनएचएआयकडे खूप लोकांच्या तक्रारी आल्या होत्या.
6 / 8
नियम असला तरी कोणालाच याचा फायदा मिळत नव्हता. कारण त्याच्या अटींमध्ये ना पुणे-बेंगलोर हायवे येत होता ना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ना अन्य टोल असलेले रोड. एनएचएआयनुसार हा नियम २००८ मध्ये नव्हताच. यामुळे अखेर हा नियमच हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
7 / 8
एनएचएआयने यावरून बोध घेऊन १० सेकंदाची ५ मिनिटे केली आहेत. टोल प्लाझावरील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी थेट फीड प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये प्रतीक्षा वेळ 5 मिनिटे पकडली जात आहे.
8 / 8
टोल गेटवर यापेक्षा जास्त वेळ कोणी लावल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. आताही मोजक्याच टोल नाक्यांवर ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
टॅग्स :tollplazaटोलनाकाNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण