Top 10 Cars: Beating Baleno and WagonR, Alto k10 Becomes No.1, starting Priced at Just Rs 4 Lakh
Top 10 Cars: Baleno आणि WagonRला मागे टाकून ही कार बनली नंबर-1, किंमत फक्त 4 लाख रुपये... By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 6:24 PM1 / 5 Top 10 Selling Cars In India: नुकतीच लाँच झालेली मारुती अल्टो K10 लोकांच्या पसंतीस उतरली आहे. याच कारणामुळे गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर (2022) मध्ये मारुती अल्टो K10 ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. तिने बलेनो (ऑगस्टमध्ये सर्वाधिक विक्री होणारी) आणि वॅगनआर (ऑगस्टमध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार) यांना मागे टाकले आहे.2 / 5 आता Alto K10 ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा खिताब मिळवला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये मारुती अल्टोची 24,844 युनिट्स विकल्या गेली. विशेष म्हणजे, Alto K10 ची किंमत फक्त 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. स्वस्त असल्यामुळे ग्राहकांमध्ये या कारची मोठी मागणी आहे.3 / 5 मारुती अल्टोच्या विक्रीचे आकडे आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या विक्रीचे आकडे यामध्ये 4000 पेक्षा जास्त युनिट्सचा फरक आहे. अल्टोनंतर वॅगनआर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सप्टेंबरमध्ये मारुती वॅगनआरच्या 20,078 युनिट्सची विक्री झाली. याने बलेनोला मागे टाकले आहे, तर ऑगस्टमध्ये बलेनोने वॅगनआरला मागे टाकले होते. सप्टेंबरमध्ये मारुती बलेनोने 19,369 युनिट्सची विक्री केली.4 / 5 ब्रेझा चौथ्या क्रमांकावर असून 15,445 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. यानंतर टाटा नेक्सॉन पाचव्या क्रमांकावर होती. सप्टेंबरमध्ये Tata Nexon च्या एकूण 14,518 युनिट्सची विक्री झाली आहे. तर, ऑगस्टमध्ये 15,085 युनिट्सची विक्री केली, याचा अर्थ महिन्या-दर-महिना आधारावर विक्रीत थोडीशी घट झाली आहे. यानंतर सहाव्या क्रमांकावर ह्युंदाई क्रेटा आहे, क्रेटाच्या एकूण 12,866 युनिट्सची विक्री झाली आहे.5 / 5 मारुती Eeco 12,697 युनिट्सच्या विक्रीसह सातव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर टाटा पंच आठव्या क्रमांकावर आहे. टाटा पंचच्या 12,251 युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती स्विफ्ट नवव्या क्रमांकावर होती, सप्टेंबरमध्ये 11,988 युनिट्सची विक्री झाली. तर Hyundai व्हेन्यू 10 व्या क्रमांकावर असून, 11,033 युनिट्सची विक्री झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications