top 5 diesel cars under 10 lakh rupees mahindra xuv300 tata nexon
Diesel Cars : कार घेण्याचा विचार आहे? १० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत 'या' ५ डिझेल कार्स, मायलेजही उत्तम By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:41 PM1 / 7भारतात डिझेल कारची मागणी मोठ्या प्रमणात आहे. डिझेल कार्संना मायलेज चांगले असते. पेट्रोल कारपेक्षा डिझेल कारचे मायलेज जास्त असते. जर तुम्ही देखील डिझेल कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला देशात १० लाख रुपयांच्या खाली विकल्या जाणाऱ्या ५ डिझेल कारबद्दल माहिती देणार आहोत.2 / 7टाटा अल्ट्रोज डिझेल याची किंमत ८.१५ लाख रुपये एवढी आहे. टाटा अल्ट्रोज पेट्रोल इंजिनमध्ये येते. आता यात डिझेल इंजिनचा ऑप्शन दिला जातो. ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे आणि भारतातील सर्वात स्वस्त डिझेल कार देखील आहे. यात १.५-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन (88bhp आणि 200Nm) मिळते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.3 / 7महिंद्रा बोलेरो आणि बोलेरो नियो याची किंमत ९.६२ लाख रुपयांपासून सुरू होते. महिंद्रा बोलेरो ही एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही आहे. ही महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. बोलेरो नेमप्लेटवरून दोन एसयूव्ही विकल्या जातात - बोलेरो आणि बोलेरो निओ. दोन्ही 7-सीटर डिझेल कार आहेत. दोन्हीमध्ये 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. परंतु, दोन्हीचे पॉवर आउटपुट वेगळे आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.4 / 7महिंद्रा XUV300 डिझेल ९.९० लाख रुपयांपासून सुरू होते. ही सब-4 मीटर एसयूव्ही आहे. यात पेट्रोल इंजिन पर्याय तसेच १.५-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 115bhp आणि 300Nm जनरेट करते. कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड एएमटीचा पर्याय आहे.5 / 7Kia Sonet डिझेल ९.९५ लाख रुपयांपासून सुरू होते. Kia Sonet अतिशय वेगाने लोकप्रिय झाली आहे. यात अनेक पॉवरट्रेन पर्याय आहेत, त्यापैकी १.५-लिटर डिझेल इंजिन (113bhp आणि 250Nm). डिझेल इंजिन iMT आणि 6-स्पीड AT च्या पर्यायासह देण्यात आले आहे.6 / 7टाटा नेक्सॉन डिझेल ही कार ९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. हे १.५-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन (113bhp आणि 160Nm) सह येते. यात 6-स्पीड एमटी आणि एएमटीचा पर्याय मिळतो. यात पेट्रोल इंजिनचा पर्यायही मिळतो.7 / 7डिझेलच्या कार्संना चांगले मायलेज मिळते त्यामुळे या कार्संना मोठी मागणी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications