top 5 mistakes with manual gear car driving; avoid it otherwise will harm you
मॅन्युअल गिअरची कार चालविताना या चुका करू नका; नाहीतर होईल मोठे नुकसान... By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 4:13 PM1 / 10सध्या कार कोणती घ्यावी, पेट्रोल की डिझेल? गिअर ऑटोमॅटिक की मॅन्युअल यावरून खूप कन्फ्यूजन असते. देशात सर्वाधिक मॅन्युअल गिअरच्याच कार वापरल्या जातात. ऑटोमॅटिक हळू हळू जोर पकडत आहे. परंतू त्यामध्ये सीएनजी येत नसल्याने, मायलेज कमी आणि शहरातच फायद्याची असल्याने मॅन्युअललाच जास्त मागणी आहे. 2 / 10मॅन्युअल गिअरच्या कार चालविताना अधिकतर लोक काही चुका करतात. ज्या गाडी आणि चालकालाही नुकसान पोहोचवू शकतात. 3 / 10आम्ही तुम्हाला अशा 5 मोठ्या चुका ज्या वारंवार होतात, त्याबद्दल सांगणार आहोत. या चुका मॅन्युअल गिअरबॉक्सच्या कारमध्ये कधीही करू नयेत. 4 / 10कार चालक एक मोठी चूक करतात, जी त्यांची सवय बनून जाते. कार चालविताना गिअर लिव्हर किंवा रॉडवर हात ठेवतात. मॅन्युअल गिअरमध्ये आपल्याला केवळ लिव्हर दिसतो परंतू त्याचे फंक्शन दिसत नाही. गिअर बदलत असताना स्थिर राहणारा सिलेक्टर फोर्क रोटेटिंग कॉलर हा हात ठेवल्याने दाबून राहतो. यामुळे कॉलर त्या गिअरला दाबून ठेवतो. 5 / 10अशावेळी खड्डा आला किंवा हात जरी हलला तरी देखील अचानक गिअर बदलला जाऊ शकतो. वरचा गिअर पडला तर इंजिनवर प्रेशर येते, खालचा पडला तरीही तेवढी ताकद नसल्याने बंद पडण्याची शक्यता असते. यामुळे दोन्ही हात स्टेअरिंगवरच ठेवावेत. 6 / 10कार चालविताना अनेकजण क्लच पॅडलवर पाय ठेवतात. यामुळे काही प्रमाणात का होईना क्लच दाबला जातो. यामुळे इंजिन जास्त वापरले जाते. तसेच क्लच प्लेट जास्त घासल्या जातात. यामधील मोठा धोका म्हणजे अचानक समोर काहीतरी आले, ब्रेक मारायचा झाल्यास तुम्ही चुकून क्लच दाबण्याची शक्यता आहे. अशाप्रकारची अनेक अॅक्सिडेंट झाली आहेत. एकतर डेड पॅडल किंवा क्लचवरील पाय बाजुला ठेवावा. 7 / 10सिग्नल छोटे असल्याने सारखी सारखी कार बंद करणे हिताचे नाहीय. पेट्रोल असेल तर ठीक डिझेल असेल तर इंजिन सुरु करायला बॅटरी खूप लागते. मात्र, म्हणून सिग्नलला थांबला असाल तर कार गिअरमध्ये ठेवू नका. न्युट्रलवर ठेवणे सर्वांसाठी सुरक्षेचे असते. खूपवेळ क्लच, ब्रेकवर ताकदीने पाय ठेवल्याने तो लूज होण्याची शक्यता असते. यामुळे गाडी झटकन पुढे जाऊन अपघाताचा धोका असतो. 8 / 10वेग वाढवायचा असेल तर सारेच खालचा गिअर वापरतात. मात्र, असे केल्याने इंजिनवर दबाव पडतो आणि आवाज येऊ लागतो. यामुळे इंधनाचावापरही जास्त होतो. इंजिनदेखील लवकर खराब होण्याची शक्यता असते. कारचा गिअर नेहमी योग्य आरपीएमवर बदलावा. त्यानुसारच अॅक्सिलेटर दाबावा.9 / 10बऱ्याचदा चढण, घाट असेल तर वाहन चालविताना वाट लागते. कार थांबलेली असेल तर ती उठविणे हे जिकिरीचे काम आहे. कारण कारमध्ये आधीच वजन असते त्यामुळे तिला वेग देणे कठीण होऊन बसते. अशावेळी क्लच अर्धवट दाबून कार उठविली जाते. परंतू हे त्या पॉईंटपुरते ठीक आहे. अख्ख्या चढणीला क्लच दाबून वाहन पुढे दामटविणे धोक्याचे आहे. क्लच प्लेट खराब होतात. हा प्रकार सीएनजी किंवा पेट्रोल कारमध्ये सर्रास होतो. 10 / 10 तसेच पूर्ण क्लच दाबल्यास कार न्युट्रल स्थितीत जाते, यामुळे कार मागे जाऊ लागते. यामुळे सारखा क्लच दाबून ठेवू नये. तुमच्या कारच्या मागे हातभर अंतरावर दुसरी कार थांबलेली असते. मागे आल्याने त्याच्या कारचा बंपर तुटू शकतो, तसेच तुमच्याही कारला नुकसान होऊ शकते. दोघांची भांडणे हे वेगळेच. आणखी वाचा Subscribe to Notifications