शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tork Motors Electric Bike: 120 किमी रेंज अन् जबरदस्त लूक्स; पुण्यात तयार झालेल्या स्वदेशी इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 8:38 PM

1 / 10
Tork Motors Electric Bike: बहुचर्चित Tork Motors ने अखेर आपल्या Kratos आणि Kratos R या इलेक्ट्रिक मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, पहिल्या टप्प्यात भारतातील पाच शहरांमध्ये याची डिलिव्हरी केली जाईल.
2 / 10
या दोन्ही इलेक्ट्रिक बाईक्स यावर्षी प्रजासत्ताकदिनी म्हणजेच 26 जानेवारीला लॉन्च झाल्या होत्या. याची डिलिव्हरी एप्रिलमध्ये होणे अपेक्षित होते, पण सेमिकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे डिलिव्हरीला उशीर झाला.
3 / 10
Tork Motors ने नवीन क्रेटोस इलेक्ट्रिक मोटरसायकलचे दोन व्हेरिएंट्स - Kratos आणि Kratos R लॉन्च केले होते. Kratos ची सुरुवातीची किंमत 1.08 आणि Kratos R ची सुरुवातीची किंमत 1.23 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या किमती एक्स-शोरुम पुण्यातील आहेत.
4 / 10
यात राज्य सरकार आणि FAME II, अशा दोन सब्सिडी सामील आहेत. या मोटारसायकलच्या लॉन्चिंगनंतर सुमारे सात महिन्यानंतर गाडीची डिलिव्हरी सुरू झाली आहे. कंपनीने शुक्रवारी ग्राहकांना पहिल्या 20 यूनिटची डिलिव्हरी केली. सध्या या गाडीची डिलिव्हरी पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्लीमध्ये केली जाईल. येणाऱ्या काळात इतर शहरांमध्येही या गाडीची डिलिव्हरी केली जाणार आहे.
5 / 10
मोटरसायकलमध्ये 48V ची IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज 180 किमी आहे, तर रिअल वर्ल्ड रेंज ही 120 किमी आहे. ही मोटरसायकल 100 किमी प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते.
6 / 10
यामध्ये एक्सियल फ्लक्स टाइप इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. क्रेटॉसच्या मोटरची पॉवर 7.5 किलोव्हॅट आणि टॉर्क 28 Nm आहे. तर, हाय-स्पेक Kratos R मध्ये मोठी मोटर असून, ही 9.0 Kw ची पॉवर आणि 38 Nm चा टॉर्क जनरेट करते.
7 / 10
कंपनीच्या दाव्यानुसार, ही गाडी चार सेकंदांत ही मोटरसायकल 0-40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. Kratos R मध्ये अधिक क्षमतेची मोटर आहे. याचा टॉप स्पीड 105 kmph आहे. फास्ट चार्जिंग सुविधा केवळ Kratos R मध्ये देण्यात आली आहे. तसेच जियोफेंसिंग, फाइंड माई व्हीकल फीचर, मोटरवॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड, ट्रॅक मोड आदी देण्यात आले आहेत.
8 / 10
या दोन्ही मोटारसायकलमध्ये कंपनीची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम असेल, ज्याचे नाव Tork Intuitive Response Operating System (TIROS) (टोर्क इंट्यूएटिव्ह रिस्पांस ऑपरेटिंग सिस्टम) आहे. हे सिस्टम प्रत्येक राइडचा डेटा गोळा करुन त्याचे विश्लेषण करेल.
9 / 10
यात रियल-टाइम वीजेची बचत, पॉवर मॅनेजमेंट आणि रेंजसारख्या महत्वाच्या कंपोनेंट्सवर लक्ष असेल. यात, 4.3-इंच TFT स्क्रीन, अॅप आणि क्लाउड कनेक्टिव्हिटीसोबत अँटी-थेफ्टसारखे महत्वाचे फीचर्स देण्यात आले आहेत.
10 / 10
स्टँडर्ड मॉडेलमध्ये सध्या फक्त पांढरा रंग उपलब्ध आहे. पण, हाय-स्पेक मॉडेल पांढरा, निळा, लाल आणि काळ्या रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. Tork Motors पुण्यातील EV स्टार्ट-अप आहे आणि कंपनीने पहिल्यांदा 2016 मध्ये आपल्या Tork T6X कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक मोटरसायकलला शोकेस केले होते. सहा वर्षानंतर आता कंपनी आपली इलेक्ट्रीक मोटारसायकल बाजारात घेऊन येत आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकAutomobileवाहन