toyota kirloskar motor cars sold fiercely in the year 2022
टोयोटाने घडवला इतिहास! 10 वर्षांत जे जमले नाही ते केले... By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 4:53 PM1 / 10वाहन उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटरने 2022 मध्ये इतिहास घडवला आहे. गेल्या वर्षी, कंपनीने 10 वर्षांतील सर्वाधिक विक्रीची नोंद केली. वर्ष 2022 मध्ये कंपनीने एकूण 1,60,357 युनिट्सची विक्री केली आहे. ही संख्या कॅलेंडर वर्ष 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 1,30,768 युनिट्सपेक्षा 23 टक्के अधिक आहे.2 / 10गेल्या वर्षातील विक्री ही कंपनीची गेल्या दशकातील सर्वाधिक विक्री आहे. यापूर्वी 2012 मध्ये एकूण 1,72,241 युनिट्ससह उच्च विक्री केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टीकेएमची विक्री डिसेंबर 2022 मध्ये 3.8 टक्क्यांनी घसरून 10,421 युनिट्सवर आली. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 'कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये डीलर्सना 10,834 युनिट्स पाठवले आहेत.3 / 10'गेलेले वर्ष कंपनीसाठी विक्री कामगिरीच्या बाबतीत तसेच अर्बन क्रूझर हायरायडर आणि इनोव्हा हायक्रॉस सारख्या नवीन उत्पादनांच्या लॉन्चिंगच्या दृष्टीने 'जबरदस्त' ठरले आहे.' “दोन्ही नवीन मॉडेल्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असंही कंपनीने म्हटले आहे.4 / 10ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे या वर्षाच्या सुरुवातीला काही इतर लॉन्च देखील आहेत. यामध्ये नवीन ग्लान्झा देखील समाविष्ट आहे. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.5 / 10Fortuner, Legender, Camry आणि Vellfire सारखी TKM चे फ्लॅगशिप मॉडेल्स आपापल्या सेगमेंटमध्ये बाजी मारत आहेत.6 / 10विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर समूहाने कंपनीची धुरा मानसी टाटा यांच्याकडे सोपवली आहे. मानसीची किर्लोस्कर जॉइंट व्हेंचरच्या बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 7 / 10विक्रम किर्लोस्कर यांचे नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झाले. यानंतर त्यांची एकुलती एक मुलगी मानसी कंपनीचे कामकाज पाहत आहे. मानसी टाटा आता टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड (TIEI), किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड (KTTM), टोयोटा मटेरियल हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (TMHIN) आणि Daeno Kirloskar Industries Pvt Ltd (DNKI) चे प्रमुख आहेत.8 / 1032 वर्षीय मानसी यांनी अमेरिकेतील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाइनमधून पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वडिलांना कंपनीत मदत करायला सुरुवात केली. 9 / 102019 मध्ये त्यांनी नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा यांच्यासोबत लग्न केले. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत.10 / 10व्यवसायाव्यतिरिक्त मानसी यांना चित्रकलेची खूप आवड आहे. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचे पहिले प्रदर्शन होते. टाटा कुटुंबाची सून असूनही त्या अत्यंत लो प्रोफाइल आयुष्य जगते. आणखी वाचा Subscribe to Notifications