शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्ली-NCR चं प्रदुषण कमी करणार 'ही' कार; चालता-चालता करते हवा स्वच्छ; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 7:13 PM

1 / 8
ऑटो एक्स्पो दरम्यान टोयोटाने आपली हायड्रोजन हायब्रीड कार Mirai सादर केली. टोयोटाची ही खास कार नुकतीच पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉन्च करण्यात आली आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे ही पेट्रोल-डिझेल कारपेक्षा चांगली तर आहेच, पण हवेतील प्रदूषणही कमी करू शकते.
2 / 8
टोयोटाने ऑटो एक्सपोमध्ये मिराई (Mirai) कार सर्वांसमोर सादर केली. हे कारचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल आहे. यापूर्वी Mirai टोयोटाने 2020 मध्ये जागतिक स्तरावर लॉन्च केले होते. या कारबाबत पायलट प्रोजेक्टबाबत केंद्र सरकार आणि टोयोटा यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला.
3 / 8
कंपनी आता ही पूर्णपणे फ्युचरिस्टिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या क्षणी कारची किंमत आणि लॉन्च तारखेबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
4 / 8
मिराई हे हायड्रोजन इंधन सेल इलेक्ट्रिक वाहन आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास, ही एक प्रकारची हायब्रिड कार आहे ज्याचे प्राथमिक इंधन हायड्रोजन आहे. ही एक रियर व्हील ड्राइव्ह कार आहे.
5 / 8
कारमध्ये ३ हायड्रोजन टाक्या बसवण्यात आल्या आहेत, ज्या पूर्ण भरल्यावर कारची रेंच ६४० किमीपर्यंत वाढेल. मिराईमध्ये फ्युएल सेल स्टॅक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे याला १७४ बीएचपी पॉवर देते.
6 / 8
मिराई प्युरिफायरप्रमाणे काम करते, गाडी चालवताना हवा स्वच्छ करते, कारमध्ये कॅटॅलिस्ट प्रकारचा फिल्टर बसवण्यात आला आहे. फ्यूएल सेलसाठी इंधन वापरलं जातं त्याचवेळी नॉन वोवेन फैब्रिक फिल्टर इलेक्ट्रिक चार्जच्या मदतीने प्रदुषित मायक्रो पार्टिकल्स नष्ट केले जातात. यामध्ये सल्फर डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साईड आणि पीएम २.५ कण फिल्टर होतात.
7 / 8
कारला फ्युचरिस्टिक बनवण्यासोबतच फिचर्सही खास देण्यात आले आहेत. यात १२.३-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. तसेच, यात थ्री झोन क्लायमेट कंट्रोल एसी, हिटेड स्टीयरिंग, हवेशीर जागा, हेड अप डिस्प्ले आणि ADAS तंत्रज्ञान सुसज्ज कार आहे.
8 / 8
मिराईच्या रनिंग कॉस्टमध्येही लक्षणीय घट होईल. एका अंदाजानुसार मिराई चालवण्याचा खर्च जवळपास इलेक्ट्रिक कार चालवण्याएवढाच असेल. मात्र, लवकरच सरकार आणि कंपन्यांना मिळून हायड्रोजन कारसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा लागणार आहे.
टॅग्स :Toyotaटोयोटाauto expoऑटो एक्स्पो 2023