Traffic Rules! Follow the five rules, Challan will never be torn; Money Saving Tips ....
Traffic Rule: ट्रॅफिक नियम! पाच गोष्टी पाळा, कधीही पावती फाडली जाणार नाही; पोलिसही पाहत राहतील... By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 1:06 PM1 / 7भारतात सध्या वाहतुकीचे नियम आणि त्यांचा दंड खूप कठोर करण्यात आला आहे. दंड एवढे केलेत की एकदा पावती आल्यावर पुन्हा कोणी नियम मोडायचे धाडस करणार नाही. हे धाडसीच झाले. आजही असे अनेक महाभाग आहेत, एक चलन आले तरी ते न भरता दुसऱ्यांदा नियम मोडायला तयार असतात. 2 / 7आता पेट्रोल, डिझेलचा खर्च आणि गाड्यांचे हप्ते एवढे सारे खर्च वाढलेत की हे वाहतुकीचे नियम मोडल्याचे चलन आले तर खिशावर भार पडणार आहे. यामुळे या दंडापासून वाचायचे असेल तर तुम्हाला काही नियम पाळावे लागणार आहेत. जे सर्वाधिक वेळी मोडले जातात. 3 / 7आता चौकाचौकात, वळणावळणावर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याद्वारे स्पीड तपासला जातो. यामुळे तुमची कार, बाईक जर निर्धारित वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने असेल तर तुम्हाला चलन पाठविले जाते. यामुळे वेगमर्यादा पाळा. हा दंड १००० ते २००० रुपये आहे. त्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा म्हणजे तुमचे लायसन तीन महिन्यांसाठी सस्पेंड केले जाते. 4 / 7चुकीच्या लेनमध्ये किंवा विरुद्ध दिशेने गाडी चालविल्यास दंड होऊ शकतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. हा गुन्हा केल्यास दंडासोबत शिक्षेचीही तरतुद आहे. तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते. यामुळे चुकीच्या दिशेने किंवा लेनवर गाडी चालवू नका. 5 / 7दारु पिऊन गाडी चालविल्याने रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होतात, त्यांचे परिणामही भयंकर असतात. नशेमुळे हे चालक दुसऱ्यांच्या जिवाला धोका उत्पन्न करतात. दारु पिऊन गाडी चालविल्यास पहिल्या वेळी १०००० रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांची तुरुंगवारी होऊ शकते. 6 / 7जर तुम्ही आपत्कालीन वाहनांचा म्हणजेच अँम्बुलन्स, फायर ब्रिगेड, पोलिसांची कार सारख्या वाहनांचा रस्ता रोखल्यास किंवा त्यांना पुढे जाऊ न दिल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. यामध्ये तुम्हाला १० हजारांचा दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. या वाहनांना दंडाची भीती म्हणून नाही तर माणुसकीच्या आधारे रस्ता द्यावा. 7 / 7चौकाचौकात वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी सिग्नल बसविलेले असतात. तिथेच कॅमेरेदेखील असतात. वाहतूक पोलीस जरी नसले तरी सिग्नल पहा आणि गाड्या चालवा. झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवू नका, तसे असले तरी चलन तुमच्या घरी पाठविले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications