शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बजाज-ट्रायम्फने लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, KTM पेक्षाही कमी किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 7:09 PM

1 / 7
Triumph Speed 400 India Launch: बजाज-ट्रायम्फ जोडीने भारतीय बाजारपेठेत Speed 400 ही पहिली बाईक लॉन्च केली आहे. यापूर्वी कंपनीने Scrambler 400 X चे अनावरण केले होते, पण आता Speed 400 लॉन्च करण्यात आली आहे. Scrambler 400X ची लॉन्चिंग नंतर केली जाईल.
2 / 7
Triumph Speed 400 India Launch: या नवीन बाईकची किंमत 2.33 लाख(एक्स-शोरुम) सुरू होते. Hero MotoCorp आणि Harley Davidson ने देखील काल आपली पहिली बाईक Harley Davidson X440 लॉन्च केली आहे. आता Speed 400 ची स्पर्धा Harley Davidson X440 शी असेल.
3 / 7
Triumph Speed 400 India Launch: दोन दिवसांत जगातील दोन आघाडीच्या दुचाकी ब्रँड्सनी भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने नवीन बाईक्स लॉन्च केल्या आहेत. HD X440 ही सर्वात स्वस्त हार्ले-डेव्हिडसन बाईक आहे, ज्याची किंमत एक्स-शोरुम 2.29 लाखांपासून सुरू होते. यानंतर आता ब्रिटीश मोटरसायकल कंपनी ट्रायम्फने बजाजच्या सहकार्याने पहिली बाईक बाजारात आणली आहे.
4 / 7
Triumph Speed 400: स्पेसिफिकेशन्स-कंपनीच्या सर्वात स्वस्त बाइक्समध्ये ट्रायम्फ Speed 400 चा समावेश आहे. या बाईखमध्ये लिक्विड-कूल्ड 398cc सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. बाईकचे ब्रँड-न्यू टीआर सीरीज इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. Speed ​​400 आणि Scrambler 400 X ची रचना शक्तिशाली ट्रायम्फ मॉडेल्सपासून प्रेरित आहे.
5 / 7
Triumph Speed 400: फीचर्स-बजाज आणि ट्रायम्फच्या या पहिल्या बाईकमध्ये 17 इंच अलॉय व्हील आणि MRF चे टायर्स दिले आहेत. यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कर्वी फ्युएल टँक, स्टेप-अप सीट, राउंड हेडलाईट यांसारखी फीचर्स मिळतील.
6 / 7
Triumph Speed 400: इंटरनॅशनल मार्केटप्रमाणे ही बाईकदेखील तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात फँटम ब्लॅकसोबत कार्निव्हल रेड, स्टॉर्म ग्रेसोबत कॅस्पियन ब्लू आणि स्टॉर्म ग्रेसोबत फँटम ब्लॅक कलर मिळतात.
7 / 7
Triumph Speed 400: स्वस्तात खरेदी करा बाईक-आता बाईक खरेदी करणाऱ्यांना कंपनी चांगली ऑफर घेऊन आली आहे. सुरुवातीचा 10 हजार ग्राहकांना ही बाईक 2.23 लाखांना मिळणार आहे. या बाईकची स्पर्धा हार्ले-डेविडसन X440, रॉयल एनफील्ड क्लासिक 350, KTM 390 Duke (Rs 2.97 lakh), BMW G 310 R सारख्या बाईक्सशी असेल.
टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहन