शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रायम्फची दहावी बाईक येणार...स्पीड ट्विन तिचे नाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 2:43 PM

1 / 7
ब्रिटिश मोटारसायकल कंपनी ट्रायम्फने नुकतीच आपली बोनविले बाईकच्या श्रेणीमध्ये मॉडर्न क्लासिक रेंजमध्ये आणखी एक मोटारसायकल 2019 ट्रायम्फ स्पीड ट्विन दाखविली.
2 / 7
ही मोटारसायकल 1938 मध्ये लाँच झालेल्या ट्रायम्फच्या पिहिल्या समांतर ट्विन मोटारयासकलवरून बनविण्यात आली आहे. या मोटारसायकलला जानेवारीमध्ये जागतिक स्तरावर लाँच केले जाणार आहे. भारतात या बाईकची किंमत 10 लाख रुपये असेल.
3 / 7
ट्रायम्फच्या बेनविले श्रेणीमध्ये सध्या 9 मोटारसायकल आहेत. स्पीड ट्विन ही आता या ताफ्यातली दहावी मोटारसायकल असणार आहे.
4 / 7
ट्रायम्फ थ्रक्सटन/थ्रक्सटन R स्ट्रीट फायटर व्हर्जन म्हटले तर वावगे ठरू नये. कारण यामध्ये सस्पेंशन, चेसिस, पावर आणि अन्य काही बाबी थ्रक्सटनसारखीच आहेत.
5 / 7
या बाईकमध्ये ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 1200, बोनविले बॉबर, बोनविले स्पीड मास्टर, बोनविले T120 आणि ट्रायम्फ थ्रक्सटन R या बाईकसारखेच 1200 सीसी इंजिन आहे जे 97PS आणि 112Nm ची ताकद निर्माण करते.
6 / 7
या बाईकमध्ये स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, मल्टीपल राइडिंग मोड आणि एबीएस सारखे फिचर असणार आहेत. तसेच क्विक शिफ्टर आणि नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे.
7 / 7
ट्रायम्फ कंपनीने नुकतीच भारतात 5 वर्ष पूर्ण केली आहेत. नव्या वर्षात कंपनी 6 नवीन मॉडेल लाँच करणार आहे. यापैकी काही फेसलिफ्ट असतील. सध्या भारतात कंपनीचे 16 डिलर आहेत. पुढील 3-4 वर्षांत हा आकडा 25 वर नेण्यात येणार आहे.
टॅग्स :bikeबाईकmotercycleमोटारसायकल