शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॉवरफुल इंजिनसह येतेय देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर; मिळणार जबरदस्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 5:54 PM

1 / 8
भारतीय बाजारापेठेत स्कूटरला जास्त मागणी असते. कमी खर्च, कमी देखभाल आणि उपयुक्ततेमुळे बहुतांश ग्राहक स्कूटर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. आता TVS Motors कंपनी आपली प्रसिद्ध स्कूटर TVS Jupiter पूर्णपणे नवीन आणि शक्तिशाली अंदाजात बाजारात आणण्याची तयारी करत आहे. 125CC च्या इंजिनसह ही स्कूटर लाँच होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडेच, कंपनीने या सेगमेंटमध्ये आपला नवीन कम्यूटर बार TVS Raider लाँच केली होती.
2 / 8
टीव्हीएस ज्युपिटर तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि होंडा अॅक्टिव्हा नंतर ही देशातील दुसरी सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. या स्कूटरविषयी बरीच माहिती मीडिया रिपोर्टमध्ये शेअर केली जात आहे. असे वृत्त आहे की कंपनी नवीन ज्युपिटर 125 ला पूर्णपणे नवीन रूप आणि डिझाइन देण्यात येईल.
3 / 8
दरम्यान, सध्याच्या मॉडेलमधील काही कंपोनन्ट्सही आपल्याला नव्या स्कूटरमध्ये पाहायला मिळतील. कंपनी नवीन स्कूटरला स्पोर्टी ऐवजी सिंपल लूक देऊ शकते. सध्या अशा लूकचा मोठा ट्रेंडही सुरू आहे. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या काही इलेक्ट्रीक स्कूटरच्या डिझाईनमध्येही हे दिसून आले आहे.
4 / 8
जोपर्यंत फीचर्सचा प्रश्न आहे, अशी अपेक्षा आहे की या स्कूटरला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आणि एलईडी हेडलाइट आणि टेललाइटसह मागील बाजूस स्विंगआर्म माउंट मोनोशॉक दिले जाऊ शकतात.
5 / 8
याशिवाय स्कूटरमध्ये अलॉय व्हिल्स, ट्युबलेस टायर्स आणि सोबत ड्रम ब्रेक्स स्टँडर्ड म्हणून दिले जातील. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये अॅनालॉग स्पीडोमीटर आणि डिजिटल डिस्प्ले देखील दिले जाऊ शकते.
6 / 8
नवीन ज्युपिटर 125 मध्ये, कंपनी मोठ्या अंडर-सीट स्टोरेज देऊ करू शकते, जेणेकरून दोन ओपन फेस हेल्मेट आणि इतर उपकरणे ठेवता येतील. यासाठी, इंधन टाकीच्या स्थितीत बदल दिसून येऊ शकतो असंही सांगितले जात आहे.
7 / 8
या स्कूटरमध्ये कंपनी 124.8cc क्षमतेचे एअर कूल्ड इंजिन वापरणार असून, तेच Ntorq 125 मध्ये दिले आहे. हे इंजिन 10.2 PS ची पॉवर आणि 10.8 Nm ची टॉर्क जनरेट करते.
8 / 8
मात्र, टीव्हीएसने अद्याप या स्कूटरच्या लाँचच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण असे मानले जाते की ते सणासुदीच्या काळात ही स्कूटर लाँच केली जाऊ शकते. बाजारात आल्यानंतर ही स्कूटर प्रामुख्याने अॅक्टिवा 125, सुझुकी अॅक्सेस, हिरो मॅस्ट्रो एज सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
टॅग्स :scooterस्कूटर, मोपेडIndiaभारतMarketबाजार